S M L

दुष्काळात तेरावा महिना.. गावाला पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी कोसळली

गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी नुकतीच बांधण्यात आलेली पाण्याची टाकी शुक्रवारी सायंकाळी कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे येथे ही घटना घडल्याने दुष्काळात तेरावा महिना आला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 17, 2019 09:25 PM IST

दुष्काळात तेरावा महिना.. गावाला पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी कोसळली

बब्बू शेख (प्रतिनिधी)

सटाणा, 17 मे- गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी नुकतीच बांधण्यात आलेली पाण्याची टाकी आज सायंकाळी कोसळल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे येथे घडली.टाकी कोसळली तेंव्हा एक कर्मचारी तेथे होता सुदैवाने तो थोडक्यात बचावला.अगोदरच गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली असतांना गावाची तहान भागविण्याची जबाबदारी ज्या टाकीवर होती तीच आज पत्त्याच्या बंगल्याच्या सारखी कोसळल्याने दुष्काळात तेरावा महिना कशाला म्हणतात याची प्रचिती डांगसौंदाणे गावातील ग्रामस्थांना आला असून आता पाणी कुठून मिळेल याची चिंता ग्रामस्थांना भेडसावत आहे.

सुमारे 2 हजार लोकसंख्या असलेल्या सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे या गावातील ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यासाठी भारत निर्माल योजने अंतर्गत पाण्याची टाकी बांधण्यात आली होती मात्र आज सायंकाळी ही टाकी कोसळली.अचानक घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थांना मोठा धक्का बसला.पाया घसरल्याने टाकी कोसळल्याची बोलले जात असून निषकृष्ठ दर्जाच्या कामामुळे टाकी कोसळली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे अगोदरच गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली असतांनाआता तर टाकीच कोसळल्याने ग्रामस्था मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे..


चोरट्यांनी पाण्यावर मारला डल्ला..

दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यावर चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोर-दरोडेखोर रोख रकमेसह मौल्यवान वस्तू चोरून नेतात, पण मौल्यवान वस्तूच्या ऐवजी चोरट्यांनी आता मोर्चा चक्क पाणी चोरीकडे वळविला आहे. मनमाड शहरातील श्रावस्ती नगर भागात घडली असून चोरट्यांनी सामाजिक कार्यकर्ते विलास आहिरे यांनी पिण्यासाठी टाकीत साठवून ठेवलेल्या 300 लिटर पाण्यावर डल्ला मारून पसार झाले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. एकीकडे अगोदरच शहरातील नागरिक भीषण पाणी टंचाईला तोंड देत असताना दुसरीकडे पाणी चोरीच्या या  घटनेमुळे त्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून पाण्याची राखण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.या प्रकरणी या प्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार अर्ज देण्यात आल्याची माहिती आहिरे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2019 09:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close