पाणी आणण्यासाठी निघालेल्या 11 वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू

नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाईने एका मुलाचा बळी घेतला आहे. पाणी आणण्यासाठी निघालेल्या एका 11 वर्षीय मुलाला आपला जीव गमावावा लागल्याची घटना घडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 6, 2019 08:32 PM IST

पाणी आणण्यासाठी निघालेल्या 11 वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू

बब्बू शेख, (प्रतिनिधी)

सटाणा, 6 जून- नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाईने एका मुलाचा बळी घेतला आहे. पाणी आणण्यासाठी निघालेल्या एका 11 वर्षीय मुलाला आपला जीव गमावावा लागल्याची घटना घडली आहे. हृदय पिळटून टाकणारी ही बागलाण तालुक्यातील विरगाव येथे घडली आहे. अक्षय गांगुर्डे असे या मृत मुलाचे नाव आहे. अक्षय वडिलांसोबत पाणी आणण्यासाठी जात असताना ट्रॅक्टर उलटला. ट्रॅक्टरखाली दबून नंदूचा दुर्दैवी मृत्यू झाला.

यंदा पाण्यासाठी सर्वत्र हाहाकार उडाला आहे. हंडाभर पाणी कसे व कुठून मिळेल, यासाठी दिवसरात्र अबालवृद्धांची धडपड सुरू असते. घरात पाणी नसल्याचे पाहून अक्षय वडिलांसोबत पाणी आणण्यासाठी जात असताना ट्रॅक्टरखाली सापडून त्याला जीव गमावावा लागला. अक्षयच्या मृत्यूने संपूर्ण सटाणा-बागलाण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. पाणी टंचाईने या बालकाचा बळी घेतल्याचे बोलले जात आहे

याबाबत अधिक वृत्त असे की सध्या नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात अभूतपूर्व अशी भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. घरात पाणी नसल्याचे पाहून नंदू गांगुर्डे आपल्या ट्रॅक्टरवर ड्रम घेऊन पाण्याच्या शोधत निघाले होते.वडिलांना मदत करण्यासाठी अक्षय हा देखील सोबत गेला होता. रस्त्याने जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाने ट्रॅक्टरला कट मारला त्यामुळे ट्रॅक्टर चालकाचा वाहनाला वरून नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर पलटी होऊन त्याच्या खाली सापडून होता अक्षयचा दुर्दैवी मृत्यू झाला.अचानक घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.


Loading...

VIDEO : प्रकाश मेहता प्रकरणी धनंजय मुंडेंचं फडणवीसांवर टीकास्त्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 6, 2019 08:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...