News18 Lokmat

विदर्भ मराठवाड्यात उष्णता वाढणार, पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होणार

वाढतं तापमान आणि पाणीटंचाईच्या नागरिकांना झळा, उन्हाचे चटके आणि घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण

News18 Lokmat | Updated On: Apr 27, 2019 08:11 AM IST

विदर्भ मराठवाड्यात उष्णता वाढणार, पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होणार

मुंबई, 27 एप्रिल: मुंबईसह राज्यातील तापमानाचा वाढता पारा आणि पाणीटंचाई यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विदर्भ, मराठवाड्यात उन्हाच्या झळा अधिक तीव्र होण्याची शक्यता हवाना विभागानं वर्तवली आहे. वीकेण्डला म्हणजेच शनिवार आणि रविवारी उष्णतेचा पारा वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात तापमना शुष्क राहिल. शुक्रवारपासून विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आली आहे. नागपुरात पारा 45.2 डिग्रीवर पोहचला आहे. उष्णतेची ही लाट पुढील 4 दिवस कायम राहणारा असल्याची हवामान विभागाकडून माहिती मिळत आहे. धुळे, परभणी, चंद्रपूर, अकोल्यातही तापमानाचा पारा वाढणार आहे.

वाढत्या तापमानामुळे फक्त माणसांनाच नाही तर पशुपक्षांना सुद्धा याच्या झळा बसताहेत.

उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट आलीय. गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात पारा 46 अंशाच्या पुढे पोहाचल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेत वाढत्या तापमानामुळे शहरी भागात रस्त्यावर शुकशुकाट दिसूत आहे.

सांगली, सातारा, कोल्हापुरातील तापमान 41 अंशावर पोहोचलं आहे.

वाढतं तापमान आणि उन्हाच्या झळांनी हैराण नागरिक त्रस्त आहेत.

Loading...

या वाढत्या तापमानामुळे आणि पाणीटंचाईमुळे अनेक गावांमध्ये भीषण समस्या निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना घोटभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते आहे. अनेक नद्या विहिरी ओस पडले आहेत. तर धरणातील पाण्यानंही तळ गाठला आहे. अनेक धरणांमध्ये 20 ते 30 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मे महिन्यात पाण्याची समस्या आणि तीव्र उष्णतेची लाट अशी दुहेरी समस्येचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे.

VIDEO: हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत, त्र्यंबकेश्वरमधील भीषण वास्तव


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 27, 2019 08:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...