News18 Lokmat

नाशिकला महापूराचा फटका तर मराठवाड्यात मात्र 400 गावांना फायदा

गोदावरी नदीला आलेल्या पुराचं पाणी मराठवाड्यातील जायकवाडी जलाशयात पोहचले आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 9, 2019 10:02 PM IST

नाशिकला महापूराचा फटका तर मराठवाड्यात मात्र 400 गावांना फायदा

हरीष दिमोटे, प्रवरासंगम 9 जुलै : नाशिक आणि त्रंबकेश्वर परिसरात झालेल्या पावसामुळे नाशिकला चांगलाच फटका बसला. सखल भागात पाणी घुसलं. अनेकांना सुरक्षीत स्थळी आश्रय घ्यावा लागला. पण गोदावरीला आलेल्या या पुरामुळे मराठलवाड्याला चांगलाच फायदा होणार आहे. हे पाणी जायकवाडी धरणात पोहलं असून त्याचा 400 गावांना फायदा होण्याची शक्यता आहे.

गोदावरी नदीला आलेल्या पुराचं पाणी मराठवाड्यातील जायकवाडी जलाशयात पोहचले आहे. त्यामुळे तहानलेल्या मराठवाड्यातील 400 गावांना दिलासा मिळाला आहे. आज प्रवरासंगम येथे गोदावरीच्या पाण्याचे वाजत गाजत पूजन करण्यात आलं. गेली चार महिने दुष्काळाच्या झळा सोसत असल्याने आज पाणी पाहून गावकऱ्यांचे डोळे पाणावले होते.

पावसामुळं सामना थांबला, भारताला मिळू शकते इतक्या धावांचे आव्हान

नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे  गोदावरीचे पाणी पोहोचल्यानंतर वाजत गाजत पाण्याचे पूजन करण्यात आलं. महिलांनी नदीची खणा नारळाने ओटी भरून पूजा केली. नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे तब्बल 27 हजार क्युसेक वेगाने हे पाणी जायकवाडीच्या जलाशयात पोहचले. धरणातील पाण्याने तळ गाठल्याने अनेक पाणीपुरवठा योजना बंद झाल्या होत्या आता हे पाणी दाखल झाल्याने किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. येत्या काही दिवसात मराठवाड्यात जोरदार पाऊस व्हावा यासाठीही गावकऱ्यांनी प्रार्थना केली.

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले 7 महत्त्वाचे निर्णय

Loading...

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 7 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये अनेक योजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तर जळगाव जिल्ह्यातील निंभोरासिम येथील हतनूर धरणबाधित मागासवर्गीय कुटुंबांना विशेष बाब म्हणून संपादित घराच्या किंमतीऐवढी नुकसान भरपाई देणार असल्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

वाशीम जिल्ह्यात दारुबंदीसाठी महिलांनी दिली पोलीस स्टेशनवर धडक

 

1.    राज्यातील अवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे आणि केंद्र शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना सुरू

2.    सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय झालेली जमिनींची हस्तांतरणे नियमानुकूल करण्यासाठी इनाम किंवा वतन विषयक प्रमुख कायद्यांत सुधारणा करण्यास मान्यता

3.    राज्याच्या बंदर विकास धोरण-2016 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यामध्ये विविध सुधारणा करण्यास मंजुरी

4.    सार्वजनिक हितासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) हस्तांतरित होणाऱ्या जमिनींचे मुद्रांक शुल्क माफ

लग्नाच्या आधी HIV टेस्ट आवश्यक, हे सरकार बनवणार कायदा

5.    रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व गुहागर या दोन तालुक्यांसाठी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची स्थापना चिपळूण येथे करण्याचा निर्णय

6.    जळगाव जिल्ह्यातील निंभोरासिम येथील हतनूर धरणबाधित मागासवर्गीय कुटुंबांना विशेष बाब म्हणून संपादित घराच्या किंमतीऐवढी नुकसान भरपाई देणार

7.    अल्पसंख्याक समुदायातील महिलांना बचतगटांची स्थापना करुन कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याच्या योजनेस मान्यता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 9, 2019 10:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...