• होम
  • व्हिडिओ
  • तो स्टार्ट करणार तेवढ्यात बाईकने घेतला पेट; घटनेचा LIVE VIDEO
  • तो स्टार्ट करणार तेवढ्यात बाईकने घेतला पेट; घटनेचा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Mar 17, 2019 09:37 AM IST | Updated On: Mar 17, 2019 09:39 AM IST

    वाशिम, 17 मार्च : वाशिम शहरातील पाटणी चौकात बजाज पल्सर बाईकनं अचानक पेट घेतला. बाईकस्वार गाडी सुरू करणार तेव्हढ्यात गाडीच्या ईंजीनमधून धूर येत असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि तो खाली उतरला. तेव्हढ्यात बाईकच्या ईंजीनमधून आगीच्या ज्वाळा निघायला लागल्या. सुरुवातीला अनेकांनी पाण्याचा मारा करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. अखेर काही जणांनी माती फेकून आग विझवली. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ही संपूर्ण घटना चौकातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी