S M L

VIDEO : शेतीच्या वादातून जन्मदात्या आईला ट्रॅक्टरखाली ढकलले

80 वर्षीय जाणकाबाई बंडाळे यांच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Sachin Salve | Updated On: Jun 24, 2018 09:04 AM IST

VIDEO : शेतीच्या वादातून जन्मदात्या आईला ट्रॅक्टरखाली ढकलले

वाशिम, 23 जून : 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' असं म्हटलं जात असलं तरी वाशिममधील घटना ह्रदय पिळवाटून टाकणारी आहे पैसा आणि जमिनीसाठी जन्मदात्या आईचा अतोनात छळ करणाऱ्या मुलाने आईला ट्रॅक्टरखाली ढकलले.

वाशिम जिल्ह्यातील मुंगळा गावातील दळवी आणि राऊत कुटुंबामध्ये शेती वरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे.  राऊत कुटुंबाचे लोक शेतात पेरणी करिता गेले असता दळवी कुटुंबीयाने विरोध करण्यासाठी स्वत:च्या  80 वर्षीय जाणकाबाई बंडाळे आईच्या वयाचा विचार न करता पेरणी करणाऱ्या ट्रॅक्टरखाली ढकलून दिले.

वेळोवेळी दळवी कुटुंब पेरणीसाठी त्रास देत असल्याने राऊत कुटुंबीयाने दळवी कुटुंबाला झाडाला बांधून मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये दोघांच्या विरोधात  परस्पराविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पीक कर्जासाठी बँक मॅनेजरची शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी

Loading...

दरम्यान, वयोवृद्ध आईचा छळ केल्याप्रकरणी सून आणि मुला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जेष्ठ नागरिक पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियमाअंर्तगत पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

80 वर्षीय जाणकाबाई बंडाळे यांच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 20 खोल्यांचे घर सून आणि मुलाने स्वत:च्या नावावर केले असल्याचा आरोप जाणकाबाईंनी केला. एवढंच नाहीतर मुलाने आई राहत असलेल्या खोलीचा वीज पुरवठा,नळजोडणी बंद केल्याचा आरोप केलाय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 23, 2018 08:15 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close