S M L

वृद्ध आईला ट्रॅक्टरखाली टाकणाऱ्या क्रूर नातवाला अटक

वाशिम मुंगळा गावात वृद्ध आईला ट्रॅक्टरखाली टाकणाऱ्या मुलांसह नातवावर मालेगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला. नातू अंकुश आणि मुलाला पोलिसांनी अटक केली.

Sonali Deshpande | Updated On: Jun 25, 2018 10:40 PM IST

वृद्ध आईला ट्रॅक्टरखाली टाकणाऱ्या क्रूर नातवाला अटक

वाशिम, 24 जून : वाशिम मुंगळा गावात वृद्ध आईला ट्रॅक्टरखाली टाकणाऱ्या मुलांसह नातवावर मालेगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला. नातू अंकुशला पोलिसांनी अटक केली.

मुलगा कितीही करंटा निघो पण आईची माया त्याच्या सर्व चुकांवर पांघरूण घालत असते. ज्या आईनं जन्म दिला या जगात उभं राहाण्याची ताकद दिली त्याच मातेच्या जीवावर वाशिम इथला उलट्या काळजाचा मुलगा उठला. पण आईचं हृदय किती विशाल असतं याची प्रचिती या घटनेतही आली.

एखाद्या चेंडूप्रमाणे या नराधम मुलानं आपल्या आईला मरण्यासाठी ट्रॅक्टरसमोर फेकून दिलं. आई हातापाया पडत गयावया करत होती पण उलट्या काळजाच्या या मुलाच्या हृदयाला काही पाझर फुटला नाही. जिनं रक्ताचं पाणी करून वाढवलं त्या मातेला जमिनीच्या काही तुकड्यासाठी त्यानं मृत्यूच्या दाढेत ढकललं. त्याहूनही संपातजनक म्हणजे या घटनेचा व्हिडिओ तयार करून स्वत व्हायरल केला.  पण इतका भयंकर प्रसंग स्वतःवर बेतल्यानंतरही या मातेच्या हृदयातून मुलासाठी निघाले ते फक्त प्रेमाचे बोलच.व्हिडिओ पाहून आता पोलिसांनी मुलांविरोधात गुन्हा दाखल केलाय. नातवाला अटक केली असली तरी मुलगा कैलास दळवी फरार झालाय. कोणी न इथं कुणाचा, सारीच नाती खोटी या म्हणीचा प्रत्यय या घटनेतून येतोय.

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं म्हणतात. पण लोभानं जेव्हा माणूस आंधळा होतो तेव्हा मग त्याला रक्ताच्या नात्यांचाही विसर पडतो. या मुलालाही संपत्तीपेक्षा आईचा जीव कवडीमोल वाटला. पण मृत्यू पुढ्यात उभा असूनही त्या वात्सल्यमूर्ती आईच्या हृदयाच्या कप्प्यात होतं ते मुलाचं शुभ चिंतन...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 24, 2018 11:26 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close