S M L

'सैराट'मधील 'त्या' विहिरीत पडून वारकऱ्याचा मृत्यू

दिंडीतील वारकरी मोहन नामदेव बोगळ हे पहाटे शौचालयाला जाताना 96 पायऱ्याची विहीर न दिसल्याने ते विहिरीत पडले.

Sachin Salve | Updated On: Jun 29, 2017 04:43 PM IST

'सैराट'मधील 'त्या' विहिरीत पडून वारकऱ्याचा मृत्यू

29 जून : करमाळ्यातील श्रीदेवीचामाळ इथं 96 पायऱ्याच्या विहिरीत पडून एका वारकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली. विशेष म्हणजे या 96 पायऱ्याच्या विहिरीत 'सैराट' चित्रपटाचे चित्रिकरण झाले होते.

मराठी चित्रपट सृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या सैराट चित्रपटाने अवघ्या महाराष्ट्राला याड लावलं होतं. या चित्रपटासाठी करमाळ्यात ज्या ज्या ठिकाणी चित्रिकरण करण्यात आलं होतं ते प्रत्येक ठिकाण पर्यटनस्थळ झालंय. सैराटमध्ये दाखवण्यात आलेल्या 96 पायऱ्याच्या विहिरीत परश्याने उडी टाकली होती. या  दृश्याने सर्वांची मनं जिंकली होती. पण आता याच विहिरीबाबत एक दुख:द घटना घडलीये.

मोहन नामदेव बोगळ (वय 75 ) असं मृत्यू झालेल्या वारकऱ्याचं नाव आहे. श्री खंडोबा दिंडी सोहळा बुधवारी श्री देवीचामाळ येथे मुक्कामाला आला होता. दिंडीतील वारकरी मोहन नामदेव बोगळ हे पहाटे शौचालयाला जाताना 96 पायऱ्याची विहीर न दिसल्याने ते विहिरीत पडले.साधारणपणे 50 फूट उंचीवरून ते विहिरीत पडले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाला होता. करमाळा उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी त्यांचा मृतदेह मृतदेह त्यांच्या मुळगावी वाकळी खंडोबाचे, तालुका राहता  अहमदनगर येथे पाठवण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 29, 2017 04:39 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close