वारी शेवटच्या टप्प्यात, विठुरायाची लागलीसी आस!

वारी शेवटच्या टप्प्यात, विठुरायाची लागलीसी आस!

माऊली, तुकोबांचा पालखी सोहळा आज सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतोय. आषाढी वारीच्या प्रवासाचा हा अंतिम टप्पा मानला जातो.

  • Share this:

28 जून : माऊली, तुकोबांचा पालखी सोहळा आज सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतोय. आषाढी वारीच्या प्रवासाचा हा अंतिम टप्पा मानला जातो. माऊलींची पालखी आज नातेपुते मुक्कामी असणार आहे तर संत तुकारामांची पालखी आज सराटी मुक्कामी असणार आहे जिल्ह्याच्या हद्दीवर दोन्ही पालख्याचं स्वागत झाल्यानंतर दोन्ही या दोन्ही पालख्या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतात.

माऊलींच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण सदाशिव नगरला पार पडतं. तर तुकोबांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण अकलूजमध्ये संपन्न होतं. वारकऱ्यांसाठी ही मोठी पर्वणीच असते. वारी वाटेवरच्या याच शेवटच्या टप्प्यात वारकरी लाडक्या विठुरायाचा धावाही करतात. माऊलींच्या पालखीचा धावा हा वेळापूरच्या माऊंटआबू टेकडीवर तर तुकोबांच्या पालखीचा धावा हा तोंडलं बोंडल्यापाशी पार पडतो.

रिंगण सोहळा आणि धाव्याला वारीत विशेष महत्त्व असतं. एकूणच जसजसं पंढरपूर जवळ येतं,तसतसा वारकऱ्यांचा उत्साह आणखीच द्विगुणीत होत जातो. तिकडे पांडुरंगाची पंढरीही वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2017 11:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...