औरंगाबादमध्ये पेठे ज्वेलर्समधून 27 कोटींचं सोने लंपास; 3 आरोपी गजाआड

औरंगाबादमध्ये पेठे ज्वेलर्समधून 27 कोटींचं सोने लंपास; 3 आरोपी गजाआड

औरंगाबादमधील Waman Hari Pethe दुकानातून तब्बल 27 कोटी 31 लाख सोन्याची चोरी झाली आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 04 जुलै : औरंगाबादमधील पेठे ज्वेलर्समधून तब्बल 27 कोटी 31 लाख रूपयांचे लंपास करण्यात आले. 58 किलो सोने चोरीमध्ये पोलिसांनी 3 जणांना बेड्या ठोकल्या असून त्यांची रवानगी आता जेलमध्ये करण्यात आली आली आहे. तर, चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. औरंगाबादमधील समर्थनगर भागातील वामन हरी पेठे ज्वेलर्समध्ये हा सारा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मॅनेजरनं आपल्या तीन सहाकाऱ्यांच्या साथीनं 27 कोटींचं सोनं लंपास केलं होतं. अंकुर राणे, राजेंद्र जैन, लोकेश जैन, आणि एका महिलेचा यामध्ये सहभाग आहे. याप्रकरणातील सर्व आरोपी हे औरंगाबादचे रहिवासी आहेत. या प्रकरणातील महिलेला मात्र अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तर, झाल्या प्रकारबद्दल सध्या औरंगाबादमध्ये देखील जोरदार चर्चा सुरू आहे.

भारतात सर्वात कमी बेरोजगारी; ILO रिपोर्टचा दावा

कसं केलं सोनं लंपास? कसा लागला छडा?

औरंगाबादमधील समर्थनगर भागात वामन हरी पेठे ज्वेलर्सचं दुकान आहे. या दुकानात अंकुर राणे हा मॅनेजरपदावर कार्यरत होता. दुकानाची सर्व जबाबदारी अंकुर राणेवर विश्वासानं सोपवण्यात आली होती. अंकुर हाच दुकानातील सोनं, हिरे आणि दागदागिन्यांची जबाबदारी सांभाळत होता. पण, मागील सहा महिन्यांपासून दुकानातील व्यवहारामध्ये अनियमितता आढळली. त्यानंतर दुकानातील सर्व व्यवहाराचे ऑडिट करण्यात आली. यावेळी दुकानातील गैरव्यवहार समोर आला. या साऱ्या प्रकरणाची दखल विश्वनाथ प्रकाश पेठे यांनी दखल घेत क्रांतीचौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तात्काळ सुत्रं हालवत अंकुश राणे, राजेंद्र जैन, लोकेश जैन यांना अटक केली आहे. दरम्यान तिघांना आता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

VIDEO: पश्‍चिम द्रुतगती महामार्गावर ट्रॅफिक जाम, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 4, 2019 03:35 PM IST

ताज्या बातम्या