खोल दरीच्या कठड्यावर मृत्यूला मात, 'आंबेनळी' सारखी दुर्घटना थोडक्यात टळली!

चालक मोहन बांदल यांनी ब्रेक लावल्याने बस दरीच्या टोकावर जाऊन थांबली. या बसमधून 76 प्रवाशी प्रवास करीत होते

  • Share this:

 मोहन जाधव, 08 नोव्हेंबर :  पुणे-महाड एसटी बसला महाड हद्दीत वाघजाई घाटामध्ये आंबेनळी बस दुर्घटनेसारखा अपघात थोडक्यात टळला. एसटी बसचालक मोहन बांदल यांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला आहे.

 खराब रस्त्यामुळे वळणावर बसचा ताबा राखण्यात चालकाला यश आल्याने गाडीतून प्रवास करणारे सुमारे 76 प्रवासी सुखरुप बचावल्याची प्राथमिक माहिती महाड आगारातून देण्यात आली आहे.

  प्राथमिक माहितीनुसार सकाळी आठ वाजता भोर आगारातून एसटी बस (एमएच 14/ बीटी 3847) चालक मोहन बांदल 76 प्रवाशांना घेऊन महाड दिशेने रवाना झाले होते.

 बाराच्या सुमारास वाघजाई घाटामध्ये बस आली असताना वाघजाई मंदिरापासूनच्या महाड हद्दीतील दुसऱ्या वळणावर आली असता खराब रस्त्यामुळे गाडीत तांत्रिक बिघाड झाल्याचे चालक मोहन बांदल यांच्या लक्षात आले.

 त्यामुळे चालकाने प्रसंगावधान दाखवून तातडीने बसला ब्रेक लावला.

   चालक मोहन बांदल यांनी ब्रेक लावल्याने बस दरीच्या टोकावर जाऊन थांबली. या बसमधून 76 प्रवाशी प्रवास करीत होते.

  चालकाच्या प्रसंगावधनामुळे पुढे होणारा मोठा अनर्थ यामुळे टळला अन्यथा आंबेनळी घाटात झालेल्या बस अपघातासारखी परिस्थिती उद्भवली असती. बस मधून लहान मुलासह आबालवृद्ध प्रवास करीत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2018 04:41 PM IST

ताज्या बातम्या