पनवेल, भिवंडी आणि मालेगाव पालिकेसाठी मतदान संपलं, सरासरी 55 टक्के मतदान

तिन्ही महानगरपालिकेच्या एकूण 252 जागांसाठी 1 हजार 251 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालंय.

Samruddha Bhambure | Updated On: May 24, 2017 08:32 PM IST

पनवेल, भिवंडी आणि मालेगाव पालिकेसाठी मतदान संपलं, सरासरी 55 टक्के मतदान

24 मे : पनवेल, भिवंडी आणि मालेगाव महापालिकांसाठीचं मतदान आज (बुधवारी) पार पडलं. मालेगावात झालेली हाणामारीची घटना वगळता इतर ठिकाणी मतदान शांततेत पार पडलं. या तिन्ही महापालिकेत सरासरी 55 टक्के मतदान झालंय. तिन्ही महानगरपालिकेच्या एकूण 252 जागांसाठी 1 हजार 251 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालंय.

सकाळी साडेसातला मतदानाला सुरुवात झाली होती. पण सुरुवातीला मतदानाचा वेग मंदावलेला पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रानंतर मतदानानं वेग पकडला होता.

पनवेल महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक असून, रायगड जिल्ह्यातील पहिलीच महापालिका म्हणून या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागलंय. तर मालेगावातील सुरक्षा व्यवस्थेवर नजर ठेवण्यासाठी पहिल्यांदाच ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आलाय.

मुस्लिम बहुल मालेगावातही आज मतदान होतंय, म्हणूनच तिथं भाजपने प्रथमच सर्वाधिक मुस्लिम उमेदवार दिलेत. एवढंच नाहीतर बीफबंदी उठवण्याचं आश्वासनही दिलंय. त्यामुळे मुस्लिम मतदार मालेगावात खरंच भाजपला साथ देणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

या तिन्ही महापालिकांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपनं कंबर कसलीये. मात्र मतदार कुणाला कौल देतात याची उत्सुकता आता लागलीये.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 24, 2017 06:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close