S M L

लातूर, चंद्रपूर आणि परभणीत मतदानाला सुरुवात

सुधीर मुनंगटीवार, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज आहिर यांची प्रतिष्ठापणाला

Sonali Deshpande | Updated On: Apr 19, 2017 10:40 AM IST

लातूर, चंद्रपूर आणि परभणीत मतदानाला सुरुवात

19 एप्रिल : लातूर, परभणी आणि चंद्रपूरमध्ये आज महापालिका निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. 201 जागांसाठी 1 हजार 285 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

परभणीत  एकूण 65 जागांसाठी 281 मतदान केंद्रांवर मतदान मतदान होतंय.  शहरातील 2 लाख 12 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आज शहरातील कृषी विद्यापीठातून मतदान प्रतिनिंधीना मतपेट्यांचे प्रशिक्षण देऊन वाटप करण्यात आल्यात  आणि मतदान यंत्रणा पूर्णपणे सज्ज झालीय.

चंद्रपूरमधला कमी मतदान झाल्याचा अनुभव लक्षात घेता यावेळी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाने एका मोबाईल दुकानाच्या मदतीने प्रयत्न सुरू केलेत. चंद्रपुरातल्या  मोहीत मोबाईलने एक अनोखा प्रयोग केलाय. मतदान केल्यानंतर   बोटाच्या शाईसह  सेल्फी काढून महापालिकेने दिलेल्या नंबरवर पाठवायचाय. त्यातून  125  भाग्यवान विजेत्यांची  निवड होऊन त्याना मोबाईल तसंच इतर इलेक्ट्राॅनिक वस्तू दिली जाणार आहे.या महापालिकांच्या मतमोजणी 21 तारखेला होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 18, 2017 10:29 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close