मतदार यादीत चक्क शिर्डीच्या साईबाबांचं नाव

यासाठी फोटो आणि पत्ताही साईमंदिर शिर्डी असा दिला होता.

News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2018 08:32 AM IST

मतदार यादीत चक्क शिर्डीच्या साईबाबांचं नाव

शिर्डी, २९ ऑगस्ट- निवडणूक आयोगाच्या ऑनलाइन अपचा गैरवापर करून शिर्डी विधानसभा मतदार यादीत साईबाबांचे नाव घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केलाय. फेब्रुवारी महिन्यात ही घटना घडली असून या प्रकरणी नायब तहसिलदार सचिन म्हस्के यांच्या फिर्यादिवरून राहाता पोलीसांनी मंगळवारी आय.टी. माहिती तंत्रज्ञान कायदा कलम (ब) (क) नुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून १ जानेवारी २०१८ रोजी शिर्डी विधानसभा मतदार संघ यादीत ऑनलाइन प्रणालीचा गैरवापर करून शिर्डीच्या साईबाबांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी नमुना नंबर ६ भरला होता यासाठी साईबाबांचा फोटो जोडण्यात आला होता. तसेच पत्ताही साईमंदिर शिर्डी असा दिला होता. छाणनी करीत असताना हा प्रकार निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्याच वेळी राहाता पोलिसांना याबाबत कळविले होते. सदर गुन्हा सायबर क्राईमअंतर्गत असल्याने पोलिसांनी नगरला तक्रार करण्याचे सांगीतले. सायबर सेलकडे गेले असता त्यांनीही तक्रार दाखल करण्यास असमर्थता दाखविली. सदर गुन्हा येथे दाखल करता येणार नाही असे सांगितले. यामुळेच गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला. अखेर राहाता पोलिसांनी नायब तहसिलदार म्हस्के यांच्या फिर्यादी वरून अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

निवडणूक आयोगाने नागरीकांचा वेळ खर्ची होऊ नये म्हणून ऑनलाइन अपची सुविधा देऊन नागरीकांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र काही मंडळींनी या अपचा गैरवापर केला. भविष्यात अशा कृतींनी आळा बसण्यासाठी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

VIDEO : न चूकता विठ्ठलाला नतमस्तक होणारा 'तेजा'काळाच्या पडद्याआड!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2018 08:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...