विठ्ठल मंदिर समिती की राजकीय आखाडा?

पंढरपूरच्या विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी कऱ्हाडचे स्थानिक भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांची नियुक्ती करण्यात आलीय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 3, 2017 04:24 PM IST

विठ्ठल मंदिर समिती की राजकीय आखाडा?

पंढरपूर, 3 जुलै : पंढरपूरच्या विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी कऱ्हाडचे स्थानिक भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांची नियुक्ती करण्यात आलीय.

उर्वरित 8 सदस्यांमध्येही बहुतांश सदस्य हे राजकीय पार्श्वभूमीचेच आहेत. याआधी अध्यक्षपदासाठी गहिणीनाथ महाराज औसेकर यांच्या नावाची चर्चा होती. पण त्यांना आता फक्त सदस्यपदावरच समाधान मानावं लागलंय. दोन वर्षांनंतर ही नवी समिती घोषित करण्यात आलीय. अतुल भोसले हे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव यांचे जावई आहेत. गेल्या निवडणुकीत अतुल भोसलेंनी कऱ्हाडमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात निवडणूक लढली होती. त्यांचेच आता पंढरपूरच्या मंदिर समितीवर राजकीय पुनर्वसन करण्यात आलंय.

विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीवरील नवीन सदस्य आणि त्यांची पार्श्वभूमी पुढील प्रमाणे-

अध्यक्ष - डॉ. अतुल भोसले (भाजप नेते, कऱ्हाड)

सदस्य- आ. राम कदम (भाजप आमदार, घाटकोपर)

Loading...

सदस्य - शकुंतला नडगिरे (भाजप नगरसेविका, पंढरपूर)

सदस्य - दिनेश कदम (शिवसेनेचे कुर्डूवाडीचे माजी नगराध्यक्ष)

सदस्य - संभाजी शिंदे (शिवसेना तालुकाध्यक्ष, पंढरपूर)

सदस्य - सचिन अधटराव (आयात केलेला शिवसैनिक, पंढरपूर)

सदस्य - गहिणीनाथ महाराज औसेकर (किर्तनकार )

सदस्य - भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा (किर्तनकार)

पदसिद्ध सदस्य- अध्यक्ष, पंढरपूर नगरपालिका

विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीच्या नवनियुक्त सदस्यांच्या यादीवर एक नजर टाकली तर यातले बहुतांश सदस्य हे राजकीय पार्श्वभूमीचेच असल्याचं स्पष्ट होतंय. फक्त गहिणीनाथ महाराज आणि भास्करगिरी महाराज हे वारकरी सांप्रदायाचे प्रतिनिधीत्व करणारे आहेत. एवढंच नाहीतर विठ्ठल मंदिराचे पारंपारिक सेवाधारी, बडवे, उत्पात यापैकी कुणालाच मंदिर समितीत स्थान देण्यात आलेलं नाही. वारकऱ्यांनाही समितीवर पुरेसं स्थान देण्यात आलेलं नाही त्यामुळे वारकऱ्यांमध्ये या नव्या नवीन मंदिर समितीबाबत तीव्र संताप व्यक्त होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2017 04:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...