आधी प्रबोधन मग हेल्मेटसक्ती -विश्वास नांगरे पाटील

तूर्तास हेल्मेट सक्ती केली जाणार नसून नागरिकांचं प्रबोधन करू आणि मगच कारवाईचा बडगा उगारू असा पवित्रा पोलीस प्रशासनानं घेतलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 13, 2017 07:45 PM IST

आधी प्रबोधन मग हेल्मेटसक्ती -विश्वास नांगरे पाटील

13 जुलै : कोल्हापूर परिक्षेत्रात तूर्तास हेल्मेट सक्ती केली जाणार नसून नागरिकांचं प्रबोधन करू आणि मगच कारवाईचा बडगा उगारू असा पवित्रा पोलीस प्रशासनानं घेतलाय.

आज कोल्हापुरात पोलीस प्रशासन आणि सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पाडली. यावेळी नेत्यांनी शहरात हेल्मेट सक्तीची गरज काय असा सवाल केलाय. कोल्हापूर शहरात कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी जास्तीत जास्त 5 ते 6 किमी जावं लागतं असं असताना हेल्मेटची काय गरज असं मत नागरिकांनी मांडलं. नागरिकांच्या या निर्णयानंतर पोलिसांनी आधी प्रबोधन आणि मग हळूहळू सक्ती करणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे आय जी विश्वास नांगरे पाटील यांनी दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2017 07:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...