महाआघाडीचा सांगलीतील उमेदवार ठरला, राजू शेट्टींकडून विशाल पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब

महाआघाडीचा सांगलीतील उमेदवार ठरला, राजू शेट्टींकडून विशाल पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब

गेले काही दिवसांपासून सांगलीच्या उमेदवारीवरून सुरू असलेला घोळ अखेर संपुष्टात आला आहे.

  • Share this:

सांगली,30 मार्च : सांगली लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवाराची घोषणा अखेर करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आणि काँग्रेसचे नातू विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर सांगली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी विशाल पाटील यांच्या उमेदवारीबाबतची घोषणा करत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. या घोषणेमुळे गेले काही दिवसांपासून सांगलीच्या उमेदवारीवरून सुरू असलेला घोळ अखेर संपुष्टात आला आहे. आघाडीला पाठिंबा दर्शवल्यानंतर सांगलीची जागा स्वाभिमानीला मिळावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली होती.  यानंतर ही जागा काँग्रेसनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली होती. त्यामुळे या जागेवर काँग्रेसकडूनच निवडणूक लढवेन किंवा अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरेन, असा निर्णय विशाल पाटील यांनी केला होता. मात्र शुक्रवारी (29 मार्च) उशिरा रात्री राजू शेट्टी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली. या चर्चेदरम्यान विशाल पाटील यांच्या उमेदवारीबाबत निर्णय निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून गेल्या काही दिवसांमध्ये महाआघाडीमध्ये सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे.

...तर निवडणूक चुरशीची ठरेल

दरम्यान, पतंगराव कदम आणि आर.आर.पाटील या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मोठ्या नेत्यांची कमतरता महाआघाडीला या निवडणुकीत जाणवणार आहे. दुसरीकडे, विद्यमान खासदार संजय पाटील हेच पुन्हा एकदा भाजपचे उमेदवार असणार आहेत. संजय पाटील यांच्यासमोरही पक्षांतर्गत विरोध हे आव्हान असणारच आहे. पण त्याला न जुमानता त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. जर काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी एकदिलाने संजय पाटील यांना आव्हान दिलं तर ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

2014मध्ये काँग्रेसचा सांगलीतील गड ढासळला होता, कारण...

2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अनेक गड ढासळले. सांगली लोकसभा मतदासंघही याला अपवाद नव्हता. संजय काका पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून आयात करून भाजपने काँग्रेसला आस्मान दाखवलं. त्यामुळे भाजपची पाळमुळं या मतदारसंघात रोवायला मदत झाली आहे.



वाचा अन्य बातम्या

VIDEO 'वसंतदादा पाटील घराण्याची वाट काँग्रेस-राष्ट्रवादीनेच लावली'

VIDEO: पुण्याच्या उमेदवारीबाबत काय म्हणाले अशोक चव्हाण?

अफझलखान, कुंभकर्ण, पटक देंगे आणि आता 'पहले सरकार' !

VIDEO: 'आपला पंतप्रधान कोण?' उद्धव ठाकरे म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 30, 2019 03:58 PM IST

ताज्या बातम्या