कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला सुरूवात

कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला सुरूवात

ढोल ताशांच्या गजरात पारंपारिक पद्धतीने कोल्हापूरातील विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मानाच्या गणपतीची आरती करणयात आली

  • Share this:

कोल्हापूर,05 सप्टेंबर: कोल्हापूरमध्ये विसर्जन मिरवणुकीला सुरूात झाली आहे. यावेळी डॉल्बीमुक्त विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आलंय.

ढोल ताशांच्या गजरात पारंपारिक पद्धतीने कोल्हापूरातील विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. कोल्हापूरमध्ये आज सकाळी खासबाग मैदानाजवळ मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणेशाची पुजा झाल्यावर या मिरवणुकीला सुरुवात झालीय .कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि महापौर हसिना फरास यांच्या हस्ते पालखीचं पुजन झालं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मानाच्या गणपतीची आरती करण्यात आली. मिरवणुकीतील पालखी खांद्यावर घेत चंद्रकांत दादा मिरवणुकीत सहभागी झाले. शहरात पोलिसांनी सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. उत्साहात आणि शांततेत मिरवणुकीत सहभागी व्हा असं आव्हानही करण्यात आलंय.

डॉल्बीमुक्त विसर्जनासाठी यंदा पोलीस प्रयत्नशील आहेत. पोलिसांकडून मध्यरात्री डॉल्बीचे 22 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. शहरातील लाड चौकातील चव्हाण यांचे मंगल कार्यालयातील गोडावून सील करण्यात आले. कदमवाडीतील 2 गोडावून सिल करण्यात आले. गणेश मंडळांचा छुपा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2017 09:48 AM IST

ताज्या बातम्या