S M L
Football World Cup 2018

पुण्यात दगडूशेठ हलवाई मंडळाच्या गणपतीचं विसर्जन; मिरवणूक अजून सुरूच

सकाळी 7.50 मिनिटांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन करण्यात आलं.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 6, 2017 10:49 AM IST

पुण्यात दगडूशेठ हलवाई मंडळाच्या गणपतीचं विसर्जन; मिरवणूक अजून सुरूच

पुणे,06 सप्टेंबर:पुण्यात काल सकाळी सुरू झालेली विसर्जन मिरवणूक अजूनही सुरूच आहे. पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन मात्र झालं आहे.

पुण्यात सगळ्या मानाच्या गणपतींच अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन करण्यात आलं. रात्री 12 वाजता डी.जे. बंद करण्यात आले पण ढोल ताशा पथकांचं वादन रात्रभर सुरूच होतं. मध्यरात्री दगडूशेठची विसर्जन मिरवणूक निघाली. पहाटे तीनच्या सुमारास मिरवणूक लक्ष्मी रोडवर होती. रात्रभर चाललेली ही विसर्जन मिरवणूक सकाळी लवकर टिळक चौकात पोचली. त्यानंतर सकाळी 7.50 मिनिटांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन करण्यात आलं.

यावेळी ढोल ताशा सोबत डी.जे.  डॉल्बी चा दणदणाट टिपेला पोचला होता. दरवर्षी 24 तासांपेक्षा जास्त काळ  पुण्याची विसर्जन मिरवणूक चालते.यंदाही त्याच दिशेने वाटचाल सुरु आहे. पावसांच्या गैरहजेरीमुळे बघ्यांची मिरवणुकीला प्रचंड गर्दी झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 6, 2017 09:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close