महात्मा गांधींच्या विद्यापीठातच होतेय हिंसा, पाच मुलींना केले निलंबित

टोकाच्या राजकीय विचारांमधून विद्यार्थ्यांच्या गटांमध्ये भांडण होण्याच्या घटना नेहमीच्याच झाल्यात

News18 Lokmat | Updated On: Jul 11, 2018 11:43 AM IST

महात्मा गांधींच्या विद्यापीठातच होतेय हिंसा, पाच मुलींना केले निलंबित

नागपूर, 11 जुलैः महात्मा गांधींची कर्मभुमी असणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील महात्मा गांधी आंतराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातून पाच विद्यार्थीनींना तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. सध्या या विद्यापीठामध्ये निर्माण झाला आहे. गांधींच्या नावाच्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठातच हिंसा होत असल्याने हे प्रकरण गंभीर आहे.

महात्मा गांधीच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात सध्या हिंसा सुरु आहे. विद्यार्थ्यांच्या दोन गटात विद्यापीठाबाहेर झालेल्या भांडणाबद्दल शिक्षा म्हणून पाच विद्यार्थीनींना निलंबित करण्यात आलं आहे. मुळातच हिंदी विश्वविद्यालय हे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या राजकारणाचा अड्डा झालं आहे. संशोधन आणि अध्ययनाशिवाय इतर गोष्टीच विद्यापीठात महत्वाच्या झाल्या असल्याचा आरोप होऊ लागला आहे. टोकाच्या राजकीय विचारांमधून विद्यार्थ्यांच्या गटांमध्ये भांडण होण्याच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. पण पाच विद्यार्थींनींवर निलंबनाची कार्यवाई करण्याआधी विद्यापीठ प्रशासनाने समोपचाराने घेण्याची मागणी होऊ लागली आहे.

केंद्र सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात येणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, शिष्यवृत्ती आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देते. विद्यार्थी अथवा प्राध्यापक हे कुणीच स्थानिक नसल्याने विद्यापीठाच्या कारभारवर कुणाचाही अंकुश नाही. गांधीच्या विद्यापीठातच हिंसा जोपासली जात असल्याने समाजमनात नाराजी निर्माण झाली आहे.

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ अनेक कारणांमुळे चर्चेत राहिले आहे. यातील मुख्य कारणं म्हणजे -

- नक्षली विचारधारेचे प्राध्यापक आणि विद्यार्थी हेतुपुरस्कर रित्या येत असल्याचा आरोप.

Loading...

- अटक झालेल्या शोमा सेन आणि नक्षली असल्याबद्दल तुरुंगवास भोगलेले बिनायक सेन यांची पत्नी एलिना सेन विद्यापीठात विद्यादानाचे काम करायच्या.

- गेल्या काही वर्षांपासून अनेक नक्षल विचारांचे विद्यार्थीही विद्यापीठात शिक्षणाच्या नावाखाली राहत असल्याची शंका.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 11, 2018 11:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...