Maratha Reservation : काँग्रेस खोटारडी, आरक्षणाचं राजकारण करण्याचा प्रयत्न - तावडे

काँग्रेस कायम खोटं बोलत आली असून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही काँग्रेसची भूमिका खोटारडी आहे. मराठा समाजाच्या आरक्षणावर तीव्र भावना आहेत याची जाणीव सरकारला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 24, 2018 06:15 PM IST

Maratha Reservation : काँग्रेस खोटारडी, आरक्षणाचं राजकारण करण्याचा प्रयत्न - तावडे

मुंबई,ता.24 जुलै : राज्य सरकारनं सत्तेत आल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. पण हे प्रकरण कोर्टात गेलं आणि कोर्टाने त्यावर स्थगिती आणली त्यामुळे राज्य सरकारने आरक्षणाबाबत काहीच केलं नाही हा आरोप चुकीचा आहे असं स्पष्टीकरण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलंय. मराठा क्रांती मोर्चांनी शांतता आणि शिस्तीने जगात आदर्श निर्माण केला आहे. तो आदर्श कायम ठेवला पाहिजे. जी ताकद शांततेत आहे ती ताकद हिंसाचारात नाही असंही ते म्हणाले. काँग्रेस कायम खोटं बोलत आली असून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही काँग्रेसची भूमिका खोटारडी आहे. मराठा समाजाच्या आरक्षणावर तीव्र भावना आहेत याची जाणीव सरकारला आहे. मात्र हिंसाचार हा त्यावरचा तोडगा ठरू शकत नाही. काही घटक या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे काही करता येईल ते सरकारने केलं आहे. मात्र प्रकरणच जर कोर्टात गेलं असेल तर निकाल लागेपर्यंत वाट पाहिली पाहिजे. आघाडी सरकारने जे केलं नाही ते सर्व युती सरकारने केले आहे. छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती सन्मान योजना 50 टक्के फी सरकार भरते जर कोणी 100 टक्के फी घेतली तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं ही तावडे यांनी स्पष्ट केलं. राज्यात होत असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर विनोद तावडेंनी आज तातडीनं पत्रकार परिषद घेऊन सरकारची भूमिका मांडली.

हेही वाचा...

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर या गोष्टी कराव्या लागतील

Maratha Morcha Andolan: मराठा मोर्चाची उद्या मुंबई बंदची हाक

Loading...

राजकारणाच्या पलिकडे जाऊन मराठा समाजाचा विचार करा – संभाजी राजे

VIDEO : माझा मराठा मोर्चाला पाठिंबा,मुस्लिम तरुणाने केलं मुंडन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2018 06:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...