मनसेच्या सभांच्या खर्चाचं 'राज' काय? भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

राज ठाकरे कोणासाठी जाहीर प्रचार सभा घेत आहेत असा सवाल उपस्थित करत विनोद तावडे यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2019 06:35 PM IST

मनसेच्या सभांच्या खर्चाचं 'राज' काय? भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुंबई, 13 एप्रिल : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या प्रचार सभा घेत आहेत. मनसेने लोकसभा निवडणुकीत पक्षाचा एकही अधिकृत उमेदवार उभा केला नाही. मग राज ठाकरे यांच्या जाहीर प्रचार सभा कोणासाठी आहेत असा थेट सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्राद्वारे उपस्थित केला आहे.

राज ठाकरे कोणासाठी जाहीर प्रचार सभा घेत आहेत असा सवाल उपस्थित करत विनोद तावडे यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहलं आहे. या जाहीर प्रचार सभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चामध्ये दाखवायचा यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट करावं अशी मागणी भाजपा महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समितीतर्फे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या प्रचार सभा घेत आहेत. या सभांमधून राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पराभूत करण्यासाठी राहुल गांधींच्या उमेदवारांना निवडून द्या, शरद पवारांच्या उमेदवारांना निवडून द्या, असा प्रचार करत आहेत. हा प्रचार प्रत्यक्षपणे काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा होत आहे.

हेही वाचा: ...जेव्हा बारामतीत सुप्रिया सुळेंचा कट्टर विरोधक समोरासमोर येतो!

या प्रचार सभांचा खर्च कोणताच उमेदवार आपल्या निवडणूक प्रचार खर्चात दाखवत नाही. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे हा खर्च कोणाच्या खात्यात दाखवला पाहिजे ही बाब स्पष्ट होत नाही, असे तावडे यांनी पत्रात म्हटलं आहे.

Loading...

या प्रचार सभांमध्ये राज ठाकरे जर कोणत्याच उमेदवाराचे नांव घेत नसतील तर तो खर्च त्या उमेदवाराच्या खात्यात कसा दाखवायचा असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. परंतू राज ठाकरे यांचा प्रचार हा पूर्णतः राजकीय आहे. राहुल गांधी, शरद पवार यांच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठीच आहे. त्यामुळे आमचे असे मत आहे की, त्या ठिकाणच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा उमेदवारांच्या निवडणूक खर्चात हा खर्च दाखवणं गरजेचं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांच्या प्रचाराला परवानगी देण्यापूर्वी ते लोकसभा निवडणुकीत कोणत्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ही सभा घेत आहेत याचे स्पष्टीकरण घ्यावं. असेही  तावडे यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.


VIDEO: उदयनराजेंच्या डायलॉगबाजीवर आदित्य ठाकरे म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 06:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...