विनोद तावडे म्हणतात,'निम्मे पीएचडीधारक हे काॅपी पेस्ट करून पीएचडी मिळवतात'

विनोद तावडे म्हणतात,'निम्मे पीएचडीधारक हे काॅपी पेस्ट करून पीएचडी मिळवतात'

राज्यातील जवळपास निम्मे,अर्धे पीएचडीधारक हे संशोधन करून नाही तर काॅपी पेस्ट करून पीएचडी मिळवतात असा धक्कादायक खुलासा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला.

  • Share this:

10 मे : राज्यातील जवळपास निम्मे,अर्धे पीएचडीधारक हे संशोधन करून नाही तर काॅपी पेस्ट करून पीएचडी मिळवतात असा धक्कादायक खुलासा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला.

पुण्यात भारती विद्यापीठ पदवी प्रदान कार्यक्रम सोहळा पार पडला. यावेळी विनोद तावडे यांनी पीएचडीतील गैरकारभाराचा खुलासाच केला. खरंखोटं काय आहे माहित नाही. पीएचडी ही काॅपीपेस्ट तरी आहे. किंवा प्राचार्य होण्यासाठी आहे तर कुठे पगारवाढ होण्यासाठी तरी आहे. संशोधन हे नावाला आणि कॉपी पेस्ट जादा अशी स्थिती आहे असा धक्कादायक खुलासा विनोद तावडे यांनी

केला.

तसंच संशोधन हे संशोधनासाठी होतं आहे का ? आणि यातून काही डेव्हलपमेंट होतंय का ? यासाठी रिसर्च सेंटर उभं राहणं गरजेचं आहे अशी अपेक्षाही तावडेंनी व्यक्त केली. तावडे यांच्या विधानामुळे अशा पीएचडीधारकांच्या पदव्या रद्द का केल्या जात नाही असा प्रश्न निर्माण झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 10, 2017 05:51 PM IST

ताज्या बातम्या