'मुख्यमंत्र्यांना सल्ला देण्याइतक्या पंकजा मुंडे मोठ्या झाल्या?'

'मुख्यमंत्र्यांना सल्ला देण्याइतक्या पंकजा मुंडे मोठ्या झाल्या?'

पंकजा मुंडे कोणासोबत आहेत? कोणासाठी काम करतात आणि कोणत्या महत्त्वाकांक्षेसाठी काम करतात? हे त्यांनी बघावं' असा टोला विनायक मेटे यांनी पंकजा मुंडेंना लगावला आहे.

  • Share this:

बीड, 13 एप्रिल : 'सन्मानिय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेबांसारख्या चांगल्या माणसाला पंकजा मुंडेंनी वेठीस धरलं. जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री महोदयांना सल्ला देण्या येवढया त्या मोठय़ा झाल्या का?' अशी टीका शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. 'मुख्यंमत्री साहेबांनी सांगून त्या एकत नाहीत. आणि आम्हाला सांगायला लावतात हे अतिशय दुर्दैवी आहे.' असं प्रतिउत्तर विनायक मेटे यांनी पंकजा मुंडेनां दिलं.

तसंच 'स्वर्गीय मुंडे साहेबांची भारतीय जाणता पार्टी पालकमंञी पंकजा मुंडेनी शिल्लकच ठेवली नाही. फक्त शिवसंग्रामच नाही तर जुने भाजपासोबतचे नेते आणि मुंडे साहेबांचे सहकारी आज कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे आम्ही मुंडे साहेबांच्या भाजपासोबतच आहोत. मुख्यमंत्र्यासोबत आहोत.' असंही विनायक मेटे म्हणाले आहेत.

दुर्दैव पालकमंञी पंकजा मुंडेची कीव वाटते...

आमची माणसं फोडली. साडेचार वर्ष त्रास दिला तरी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं म्हणून आम्ही मदत करायला तयार होतो. मात्र कुठल्याच प्रकारचं निमंत्रण न दिल्यामुळे आम्ही ही भूमिका घेतली आहे. आम्ही महायुतीमध्ये आहोत. फक्त पंकजा मुंडे कोणासोबत आहेत? कोणासाठी काम करतात आणि कोणत्या महत्त्वाकांक्षेसाठी काम करतात? हे त्यांनी बघावं' असा टोला विनायक मेटे यांनी पंकजा मुंडेंना लगावला आहे.

हेही वाचा : मनसेच्या सभांच्या खर्चाचं 'राज' काय? भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

'मुख्यमंत्री सर तुम्ही आपलं तोंड खराब करुन घेऊ नका'

'मी जनतेसमोर साष्टांग दंडवत घेईल पण बाकी कोणासमोर झुकणार नाही. मी स्टँडर्ड राजकारण केलं आहे. त्यामुळे मी कुणाचा नामोल्लेख करणार नाही आणि मुख्यमंत्री सर तुम्ही पण आपलं तोंड खराब करून घेऊ नये,' असा सल्ला जाहीर सभेत भाजप नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमधील सभेत विनायक मेटे यांना थेट इशारा दिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना हा सल्ला दिला. मुख्यमंत्री फडणवीस मेटेंना उद्देशून म्हणाले की, 'जो बीडमध्ये भाजपसोबत तोच राज्यात महायुतीसोबत असेल. त्यांना माझं सांगणं आहे भारतीय जनता पार्टी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय पूर्ण होत नाही. म्हणून जो गोपीनाथ मुंडेंसोबत राहू शकत नाही तो भाजपसोबतही नाही.'

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. वास्तविक शिवसंग्राम हा पक्ष महायुतीचा घटकपक्ष आहे. असं असताना बीडमध्ये मात्र त्यांनी वेगळी भूमिका घेतली.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

"मुंडे साहेबांची शिकवण आहे मोडेन पण वाकणार नाही. हा माझ्या जीवनाचा मूलमंत्र आहे. मी साष्टांग दंडवत घेईल, पण फक्त जनतेसमोर. बाकी कोणासमोर झुकणार नाही. मी स्टँडर्ड राजकारण केलं आहे. मी कुणाचा नामोल्लेख करणार नाही आणि मुख्यमंत्री सर तुम्ही पण आपलं तोंड खराब करून घेऊ नये," असं म्हणत पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे विनायक मेटेंवर निशाणा साधला.


VIDEO :...म्हणून पार्थला दिल्लीत पाठवा, अजित पवारांचा तरुणांना मिश्किल सल्ला


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 09:18 PM IST

ताज्या बातम्या