'महिलांना जत्रेत नाचू द्या' म्हणून गावकऱ्यांनी पाडलं गावच बंद !

गेली 2 वर्षांपासून पोलिसांनी ही नृत्यांगना नाचवण्याची पद्धत बंद केली आहे. यावर्षी ती पद्धत सुरू करावी अशी गावकरी मागणी करत आहेत.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 8, 2017 09:39 PM IST

'महिलांना जत्रेत नाचू द्या' म्हणून गावकऱ्यांनी पाडलं गावच बंद !

08 एप्रिल : पोलिसांनी गावच्या जत्रेतल्या महिलांच्या नाचगाण्याची प्रथा बंद केल्यानं उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ईटा गावातल्या गावकऱ्यांनी गावबंद पुकारलाय. एवढंच नाही तर गावकऱ्यांनी जत्राच बंद पाडण्याचा प्रयत्न केलाय.

उस्मानाबाद-अनेक किरकोळ कारणावरून राज्यात आपण गावगावकीत वाद झाल्याचे आपण भरपूर वेळा पहिले आहेत  उस्मानाबाद जिल्यातील ईट गावात गावातील गावकरी आणि पोलीस प्रशासन यांच्यात ग्रामदेवताची यात्रेच्या प्रथेवरून गेली 4 दिवसांपासून वाद सुरू आहे.

ईट गावकरी आजूबाजूच्या 12 गावातील गावकरी गेल्या 200 वर्षी पासून खोपेश्वर या ग्रामदैवताची यात्रा भरवतात या यात्रेमध्ये इतर पारंपरिक पद्धतीप्रमाणे नृत्यांगना नाचवण्याची परंपरा आहे. मात्र गेली 2 वर्षांपासून पोलिसांनी ही नृत्यांगना नाचवण्याची पद्धत बंद केली आहे. यावर्षी ती पद्धत सुरू करावी अशी गावकरी मागणी करत आहेत. मात्र पोलिसांनी याला विरोध दर्शविला असून नृत्यांगना नाचू देणार नसल्याचं गावकऱ्यांना सांगितलं आहे.

मात्र आमच्या पूर्वजा पासून ही परंपरा चालत आली असून गावकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. केवळ पुरुषच नाही तर महिला लहान मुले ही या मागणीला घेऊन आक्रमक आहेत. मात्र, अनेक वेळा मागणी करून पोलीस मागणी मान्य करत नसल्याने गावकऱ्यांनी कालपासून पोलिसांचा निषेध नोंदवत ईट आणि परिसरातील गाव बेमुदत बंद केलेत यात्रा ही बंद पाडली आहे. एवढंच नाही यात्रा काळात ज्या पालखीतून देवाची मिरवणूक काढली जाते ती पालकी सुद्धा बंद खोलीत ठेवली आहे.

जोपर्यंत पोलीस आमच्या मागण्या मान्य करत नाहीत तो पर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे गावकरी सांगत आहेत तर आमचा यात्रेला विरोध नसून केवळ महिला नाचवण्याला विरोध आहे. गावकऱ्यांनी तो हट्ट सोडून यात्रा पार पाडवी असं आव्हान पोलिसांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2017 09:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...