भरदिवसा बँकेवर सशस्त्र दरोडा, गोळीबारात मॅनेजरचा जागीच मृत्यू

नाशिक शहरात मुथूट फायनान्सच्या कार्यालयात दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात ऑडिटरचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच जळगावात दरोडेखोरांच्या गोळीबारात विजया बँकेच्या मॅनेजरचा मृत्यू झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 19, 2019 10:39 AM IST

भरदिवसा बँकेवर सशस्त्र दरोडा, गोळीबारात मॅनेजरचा जागीच मृत्यू

जळगाव, 19 जून : नाशिक शहरात मुथूट फायनान्सच्या कार्यालयात दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात ऑडिटरचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच जळगावात दरोडेखोरांच्या गोळीबारात विजया बँकेच्या मॅनेजरचा मृत्यू झाला आहे. करण नेगे असे मृत्युमुखी पडलेल्या बॅंक मॅनेजरचे नाव आहे. रावेर तालुक्यातील निंबोल येथील विजया बँकेच्या शाखेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मिळालेली माहितीनुसार की, मंगळवारी (18 जून) बँकेचे कर्मचारी आपल्या कामात व्यस्त असताना हेल्मेट घातलेल्या दोघांनी बँकेत घुसखोरी केली. त्यानंतर त्यापैकी एकाने बंदुकीच्या धाकावर बँक लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, बँक मॅनेजर करण नेगे आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना विरोध केला. तेव्हा या दरोडेखोरांनी बँक मॅनेजर करण नेगे यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये करण नेगे यांचा मृत्यू झाला.

(पाहा : SPECIAL REPORT: मेंदूज्वराचं थैमान! 100 हून अधिक बालकांचा मृत्यू)

दरोडेखोराने करण नेगे यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. नेगे यांना गोळी लागल्याचे लक्षात येताच बँक कर्मचाऱ्यांनी सायरन वाजवला. सायरन वाजताच दरोडेखोरांनी पळ काढला. परिसरातील लोकांनी बँकेकडे धाव घेतली. स्थानिक नेत्यांनी करण नेगे यांना तात्काळ रावेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत. ही संपूर्ण घटना बँकेच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

( पाहा : VIDEO: बिग बी अमिताभ बच्चन यांची नात का होतेय ट्रोल?)

दरम्यान, नाशिकमध्ये उंटवाडीतील परिसरात मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर गेल्या आठवड्यात दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. चार सशस्त्र दरोडेखोरांनी हा दरोडा टाकत बँकेत गोळीबारही केला होता. या गोळीबारात ऑडिटरचा मृत्यू झाला होता तर तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. तर भरदिवसा नाशिक शहारात हा थरार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Loading...

SEPCIAL REPORT: बैल पोळ्याच्या दिवशी इथे करतात गाढवांची पूजा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 19, 2019 10:27 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...