अजित पवार हे भ्रष्टाचाराचे अजगर - विजय शिवतारे

अजित पवार हे भ्रष्टाचाराचे अजगर - विजय शिवतारे

शिवसेना दुतोंडी गांडुळ असल्याची टीका अजित पवारांनी कल्याणमध्ये केली होती. त्याला शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी प्रत्युत्तर दिलयं. अजित पवारांच्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राची वाट लागल्याचंही त्यांनी सांगितलं.

  • Share this:

09 जुलै : अजित पवार हे भ्रष्टाचाराचे अजगर असल्याचं प्रत्युत्तर शिवसेनेनं दिलंय. शिवसेना दुतोंडी गांडुळ असल्याची टीका अजित पवारांनी कल्याणमध्ये केली होती. त्याला शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी प्रत्युत्तर दिलयं. अजित पवारांच्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राची वाट लागल्याचंही त्यांनी सांगितलं.

आज बारामतीत जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी भ्रष्टाचाराचा अजगर कोण आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती अाहे, असं म्हटलंय. या अजगरामुळेच पूर्ण शेतकऱ्यांची अडचण झाली असल्याचा आरोप जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी केलाय. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे नाव न घेता त्यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 9, 2017 07:45 PM IST

ताज्या बातम्या