कचरा प्रश्न सोडवाला नाहीतर राजीनामा देईल -शिवतारे

कचरा प्रश्न सोडवाला नाहीतर राजीनामा देईल -शिवतारे

१५ दिवसांमध्ये कचराकोंडीचा प्रश्न सोडवला नाही तर मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्यांचं शिवतारे यांनी यावेळी घोषणा केली.

  • Share this:

06 मे : जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी आयबीएन लोकमतच्या बेधडक कार्यक्रमात फुरसुंगीचा कचरा प्रश्न उद्या मार्गी लावणार अशी घोषणा केली. आज फुरसुंगी गावात पोहचल्यानंतर जर कचरा प्रश्न सोडला नाहीतर राजीनामा देईल अशी घोषणाच शिवतारेंनी केली.

आज विजय शिवतारे फुरसुंगी गावात पोहोचले आणि कौन्सिल हॉलला बैठकी बोलावली. पण फुरसुंगी आणि उरळी देवाचीच्या ग्रामस्थांचा उपस्थित रहायला साफ नकार दिला. काळ्या पटट्या लावून मौन आंदोलन सुरूच ठेवलंय. आता कुणाशीही चर्चा करणार नाही अशी ठाम भूमिका मांडली. त्यानंतर स्वत: शिवतारे गावकऱ्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले.

१५ दिवसांमध्ये कचराकोंडीचा प्रश्न सोडवला नाही तर मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्यांचं शिवतारे यांनी यावेळी घोषणा केली.

पण तासभर शिवतारे यांनी गावकऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला तरीही कुठल्याही चर्चेला गावकऱ्यांनी विरोध दर्शवला. त्यामुळे शिवतारेंच्या शब्द गावकऱ्यांना मान्य नाही असंच दिसून आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2017 12:50 PM IST

ताज्या बातम्या