काँग्रेसच्या सतेज पाटलांचं पुन्हा 'ठरलंय', विधानसभेसाठी हालचाली

लोकसभेत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी 'आमचं ठरलंय' असा नारा देत आघाडीच्याच उमेदवाराविरोधात भूमिका घेतली होती.

News18 Lokmat | Updated On: Jun 29, 2019 02:42 PM IST

काँग्रेसच्या सतेज पाटलांचं पुन्हा 'ठरलंय', विधानसभेसाठी हालचाली

कोल्हापूर, 29 जून : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अनेक लढती रंगल्या. पण सर्वात जास्त चर्चेत होती ती कोल्हापूर लोकसभेची जागा. कारण या मतदारसंघात काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी 'आमचं ठरलंय' असा नारा देत आघाडीच्याच उमेदवाराविरोधात भूमिका घेतली होती.

विधानसभा निवडणुकीत मात्र सतेज पाटील यांनी काँग्रेसच्याच तिकीटावर लढण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. कारण सतेज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी काँग्रेसचा अर्ज घेतला आहे. याबाबत 'सरकारनामा'ने वृत्त दिलं आहे.

कोल्हापूरमध्ये बंटी Vs मुन्ना वाद

लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसच्या सतेज पाटील आणि राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक या दोन नेत्यांचा वाद चांगलाच उभाळून आला होता. सतेज उर्फ बंटी पाटील यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढणाऱ्या धनंजय महाडिकांना उघड विरोध दर्शवला. त्यासाठी 'आमचं ठरलंय' या घोषणेचाही वापर करण्यात आला होता.

सतेज पाटील यांनी केलेल्या विरोधाचा महाडिकांना फटका बसल्याचं दिसलं. कारण लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिकांचा दारुण पराभव झाला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही आघाडीतील या दोन नेत्यांमध्ये राजकीय जुगलबंदी रंगणार का, हे पाहावं लागेल.

Loading...

विधानसभेसाठी काँग्रेसचा प्लॅन

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीकरिता 6 जुलैपर्यंत अर्ज पाठवता येणार असल्याचं काँग्रेस पक्षाने जाहीर केलं आहे. तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. विधानसभेच्या तयारीसाठी सर्व पक्षांमध्ये महत्त्वाच्या बैठकी घेण्याचं सत्र सध्या सुरू आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजनाला सुरूवात केली आहे. विविध पातळ्यांवर तयारी सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्ष नियमितपणे विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजनाचा आणि पूर्व तयारीचा आढावा घेत आहेत. याचाच एक भाग म्हणून प्रदेश काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे लेखी अर्ज मागवले आहेत. इच्छुकांनी आपले अर्ज 6 जुलै 2019 पर्यंत ‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर पश्चिम, मुंबई’ येथे पाठवायचे आहेत. अशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

VIDEO: भाजप नेत्याची पुन्हा गुंडगिरी; अधिकाऱ्याला केली बेदम मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 29, 2019 02:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...