News18 Lokmat

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब

विधानसभेत विरोधकांचा गोंधळ केला. विरोधी आमदार आज वेलमध्ये उतरले. सर्व कामकाज बाजूला ठेऊन कर्जमाफीवर चर्चा घ्यावी अशी विरोधकांची मागणी आहे. पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव असल्यामुळे स्थगन प्रस्ताव घेऊ शकत नाही असं सांगत अध्यक्षांनी फेटाळला.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 11, 2017 03:22 PM IST

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब

 11 डिसेंबर : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले आहे. विरोधकांच्या विरोधामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब करण्यात आलंय.

विधानसभेत विरोधकांचा गोंधळ केला.  विरोधी आमदार आज  वेलमध्ये  उतरले. सर्व कामकाज बाजूला ठेऊन कर्जमाफीवर चर्चा घ्यावी अशी विरोधकांची मागणी आहे.  पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव असल्यामुळे स्थगन प्रस्ताव घेऊ शकत नाही असं सांगत अध्यक्षांनी फेटाळला.

तर मुख्यमंत्र्यांनीही आज विरोधकांवर  जोरदार टीका केली आहे.  तुम्ही 2008 ला संपूर्ण  विदर्भाला जितके पैसे दिले तेवढे आम्ही फक्त बुलढाण्याला दिले आहेत.   तुम्ही शेतकऱ्यांच्या तोंडाल पानं पुसली आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे तुमचं पाप आहे असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. तसंच शेतकरी   आणि बोंड अळीच्या प्रश्नावर योग्य वेळी उत्तर देऊ असंही ते म्हणाले.

त्यामुळे एकंदरच विधानसभेतील वातावरण चांगलच तापलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 11, 2017 03:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...