S M L

नाशिकमध्ये सेनेला शह देण्यासाठी भाजपचा राष्ट्रवादीला पाठिंबा !

या पाठिंबा नंतर पालघरच्या पोटनिवडणुकीचा वचपा काढण्याचा प्रयत्न भाजपनं अप्रत्यक्षरीत्या केला आहे.

Sachin Salve | Updated On: May 21, 2018 03:56 PM IST

नाशिकमध्ये सेनेला शह देण्यासाठी भाजपचा राष्ट्रवादीला पाठिंबा !

नाशिक, 21 मे : नाशिक विधान परिषद निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देत सेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना मोठा धक्का दिलाय.

भाजपचे संघटन मंत्री किशोर काळकर यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आदेश काल रात्री उशिरा झालेल्या बैठकीत दिले आहे. मात्र असं असलं तरी भाजप मध्ये दोन गट तयार झल्याचं बोललं जातं आहे.

मात्र पाठिंब्याबाबत  प्रसार माध्यमांसमोर भाजपच्या नेत्यांनी बोलण्यास नकार दिलाय. या पाठिंबा नंतर पालघरच्या पोटनिवडणुकीचा वचपा काढण्याचा प्रयत्न भाजपनं अप्रत्यक्षरीत्या केला आहे. एकूणच ही निवडणुक संजय राऊत यांनी प्रतिष्ठची केलेली आहे. मात्र भाजपच्या नव्या खेळीनं सेनेला जोरदार झटका बसला आहे.

या निवडणुकीत सेनेचे नरेंद्र दराडे, राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे आणि अपक्ष परवेज कोकणी हे रिंगणात आहे विधानपरिषद च्या या निवडणुकीत एकूण 644 मतदान असून सेनेचे सर्वाधिक 207 सदस्य असून त्या खालोखाल भाजपचे 167, राष्ट्रवादी 100 तर काँग्रेसचे 71 सदस्य आहे तर इतर पक्ष मिळून मतदारांची संख्या 99 आहे. मात्र ह्या निवडणुकीत भाजप पक्ष हा किंग मेकर च्या भूमिकेत असल्याचं दिसून येतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2018 03:14 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close