विधानपरिषद निवडणूकीत लातूर राष्ट्रवादीला तर परभणी काँग्रेसला

विधानपरिषद निवडणूकीत लातूर राष्ट्रवादीला तर परभणी काँग्रेसला

आगामी विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष पुन्हा एकत्र आले आहेत. या दोन्ही पक्षांनी 50-50 चा फॉर्म्युला मान्य केला.

  • Share this:

03 मे : आगामी विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष पुन्हा एकत्र आले आहेत. येत्या 21 मे रोजी विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यापैकी तीन जागांवरून काँग्रेस व राष्ट्रवादीतील युतीचे घोडे अडले होते. दोन्ही पक्षांनी 50-50 चा फॉर्म्युला मान्य केला. त्यानुसार अमरावती, परभणी-हिंगोली व चंद्रपूर या जागांवर काँग्रेस लढेल. तर लातूर, कोकण आणि नाशिकची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे.

भाजापामधून राष्ट्रवादी पक्षात घेतलेले रमेश कराड यांनी विधान परिषद अर्जही भरला त्यामुळे काँग्रेस नेते नाराज झाले होते. त्यानंतर काँग्रेस पक्षाने लातूर येथे उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या, अखेर ही जागा राष्ट्रवादीला मिळाली आहे. राष्ट्रवादीने लातूर, बीड उस्मानाबाद जागा बदल्यात काँग्रेस पक्षाला परभणी हिंगोली जागा देण्याच मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परभणी येथे आधी राष्ट्रवादी आमदार बाबाजान नुरीनी होते मात्र आता ही जागा काँग्रेस लढवणार आहे.

विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन, भाजपचे दोन आणि काँग्रेसचा एक सदस्य विधानपरिषदेतून मे आणि जून अखेर निवृत्त होत असल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने ही निवडणूक जाहीर केली आहे.

विधान परिषदेसाठी शिवसेनेचे उमेदवार

- हिंगोली-परभणी - विपुल बजोरिया

- नाशिक - नरेंद्र दराडे

- रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग - राजीव साबळे

विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार

- उस्मानाबाद- लातूर- बीडमधून सुरेश धस

- वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीमधून - रामदास आंबटकर

- अमरावती - प्रवीण पोटे पाटील

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2018 12:31 PM IST

ताज्या बातम्या