S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आम्हाला स्वातंत्र्य कधी मिळणार?,चिमुरडीचा व्हिडिओ व्हायरल
  • VIDEO : आम्हाला स्वातंत्र्य कधी मिळणार?,चिमुरडीचा व्हिडिओ व्हायरल

    Published On: Aug 20, 2018 09:01 PM IST | Updated On: Aug 20, 2018 11:40 PM IST

    लहानपण देगा देवा असं उगाच म्हटलं जात नाही. आता हा व्हिडिओ पाहिल्यावर तर तुम्हाला नक्कीच असं म्हणावसं वाटेल. एक निरागस चिमुरडी आम्हाला स्वातंत्र्य कधी मिळणार अशी मागणीच केली आहे. या चिमुरडीचं नाव आहे प्राची प्रशांत गिरी...प्राचीने हातात माईक घेऊन मुलांच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी जोरदार भाषण ठोकलंय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. प्राचीने सर्व लहान मुलांची व्यथाच आपल्या छोट्याशा भाषणात मांडली आहे. दरवर्षी 15 आॅगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा होतो. पण स्वातंत्र्य मिळाले कुणाला तर तुम्हा मोठ्या लोकांना...ना..लहान मुलांना कधी मिळेल ?, असा भाबडा सवाल प्राचीने उपस्थितीत केलाय. मला रोज वाटतं पावसात भिजावं, चिखलात खेळावं, पण मम्मी मला खेळू देत नाही. मला रोज वाटतं परीचा ड्रेस घालून शाळेत जावं पण मॅडम रागवतील असं म्हणून आई रागवते. मला रोज छान छान खायला आवडतं...बटर चिकन...खावं वाटतं.आईने रोज करून खाऊ घालावं...पण आई म्हणते नको नको...ताटात वाढलं ते मुक्याट्याने खा...मला रोज वाटतं मोबाईलवर गेम खेळावा पण पप्पाही मला खेळू देत नाही अशी तक्रारच प्राचीने केली. वडिलांच्या ना ना ला कंटाळून प्राचीने थेट नवा मोबाईलच मागितला. पण पप्पांनी तिला मोठी झाल्यावर मोबाईल घेऊन देईल असं आश्वासन दिलं. पण प्राचीला हेही मान्य नाही. त्यामुळे मला सांगा मुलांना मिळाले का स्वातंत्र्य..?,ज्या दिवशी आम्हाला मनाप्रमाणे खेळायला मिळेल..खायला मिळेल त्या दिवशी तोच आमचा खरा स्वातंत्र्य दिन असेल असंही तिने ठणकावून सांगितलं. चिमुरड्या प्राचीचा व्हिडिओ हा प्रचंड व्हायरल झाला आहे. बहुदा हा व्हिडिओ तिचा रेकॉर्ड करून शेअर करण्यात आलाय. पण काहीही असो लहान मुलांना स्वातंत्र्य मिळायला नको का....?

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close