S M L
  • VIDEO : भोंदूबाबाचं STING OPERATION, असं उतरवत होता 'भूत'

    News18 Lokmat | Published On: Jan 21, 2019 06:20 PM IST | Updated On: Jan 21, 2019 06:20 PM IST

    सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद, 21 जानेवारी : भूतबाधा आणि इतर तत्सम आजारावर अघोरी प्रकार करणार्‍या, तसंच भीती दाखवून व्यक्तींचे शारीरिक आणि आर्थिक शोषण करणार्‍या तांत्रिक बाबाचा भांडाफोड महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या औरंगाबाद येथील कार्यकर्त्यांनी केला. औरंगाबाद येथील हर्सुल गावात गनी कादर पठाण नावाचा एक 60 वर्षीय वयाचा तांत्रिक बाबा लोकांना झालेली भूतबाधा बाहेर काढणे, दुर्धर आजार नीट करणे, गुप्तधन शोधणे असे अघोरी प्रकार करत असे. भूतबाधा काढण्यासाठी तो विज्ञानाचा सहारा घेऊन लिंबाचा रस आणि सोडियम मेटल यांची रासायनिक अभिक्रिया करून आग लावत असे. ही आग तांत्रिक विद्यामुळे लागली गेली असं लोकांना भासवत होता. ही क्रीया करताना बरेचदा शारिरीक शोषण देखील केले जात होते. भूतबाधा आणि तत्सम अघोरी उपचार करण्यासाठी हजारो रुपयांची मागणी करत होता. भीतीपोटी व्यक्ती, बाबा जसे सांगेल तसं करण्यास तयार होते. या तांत्रिक बाबाची माहिती जेव्हा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या औरंगाबाद शाखेच्या कार्यकर्त्यांना कळाली तेव्हा त्या बाबाचे स्टींग ऑपरेशन करण्यात आले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close