• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मी दिल्लीत काम करावे अशी पक्षातील काही जणांची इच्छा - पृथ्वीराज चव्हाण
  • VIDEO : मी दिल्लीत काम करावे अशी पक्षातील काही जणांची इच्छा - पृथ्वीराज चव्हाण

    News18 Lokmat | Published On: Feb 4, 2019 10:47 PM IST | Updated On: Feb 4, 2019 10:47 PM IST

    सागर कुलकर्णी, 04 फेब्रुवारी : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केलेल्या एका वक्तव्यानं काँग्रेसमधली अंतर्गत सुंदोपसुंदी पुन्हा अधोरेखित झाली आहे. 'मी लोकसभा लढवू इच्छित नसलो तरी माझे काही पक्षांतर्गंत हितचिंतक मला दिल्लीला पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, मी लोकसभा नव्हे तर विधानसभा निवडणूक लढणार', अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या पक्षातल्या हितशत्रूंना सूचक इशारा दिला आहे. पृथ्वीराज चव्हाण हे सांगली किंवा पुण्यातून लोकसभा निवडणूकीसाठी उभे राहणार असल्याच्या वावड्या राजकीय गोटात ऐकायला मिळत होत्या. मात्र, पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानं त्यांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी