लाचखोर पोलीस कॅमेऱ्यात कैद

पोलीस सामान्य आदिवासींची लूट करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ आयबीएन लोकमतच्या हाती लागलाय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Sep 1, 2017 07:17 PM IST

लाचखोर पोलीस कॅमेऱ्यात कैद

01 सप्टेंबर : सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी असणारे पोलीस जेव्हा सर्वसामान्यांची लूट करतात तेव्हा दाद कुणाकडे मागायची ? असाच प्रकार घडलाय अमरावतीमध्ये. पोलीस सामान्य आदिवासींची लूट करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ आयबीएन लोकमतच्या हाती लागलाय.

मेळघाटातल्या धारनी इथल्या सुरजमल सोलंकी याच्या घरावर छापा टाकून  दारूविक्री करत असल्याच्या आरोपाखाली अटक करून त्याला पोलीस ठाण्यात आणलं गेलं. प्रत्यक्षात पोलिसांना दारूची एकही बाटली सापडली नाही. तरीही गुन्हे दाखल करून अटक करण्याची धमकी देत चक्क जमादार शाहीद शहा यांनी सुरजमल याचा मुलगा लालसिंग सोलंकी याच्याक़डे  2 हजार रुपयांची मागणी केली.

आपल्या वडिलांना सोडण्यासाठी लालसिंग याने 1500 रु दिले. हे पैसे मागण्याचा आणि पैसे स्वीकारून ते खिशात ठेवण्याचा व्हिडीओ  IBNलोकमतच्या हाती लागला. आता या लाचखोर पोलिसावर कारवाई करण्याची मागणी होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2017 07:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...