S M L

VIDEO : नेहा पेंडसेला दहीहंडी कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांची धक्काबुक्की

News18 Lokmat | Updated On: Sep 5, 2018 10:46 PM IST

VIDEO : नेहा पेंडसेला दहीहंडी कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांची धक्काबुक्की

प्रफुल्ल खंदारे, बुलडाणा, 05 सप्टेंबर : भाजपचे आमदार राम कदम यांच्या वक्तव्यामुळे राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. अशातच भाजप कार्यकर्त्यांचा आणखी एक प्रताप समोर आलाय. बुलडाण्यामध्ये भाजप नेत्याने आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात अभिनेत्री नेहा पेंडसेला धक्काबुक्की झाल्याची संतापजनक घटना समोर आलीये.

बुलडाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यात भाजपच्या दहीहंडी च्या कार्यक्रमात मध्ये आमंत्रित मराठी सिनेअभिनेत्री नेहा पेंडसे यांना दिलेल्या चुकीच्या वागणुकीबद्दल चिडल्याचा एक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. राज्यभरात झालेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात मोठा उत्साह असतो हाच उत्साह द्विगुणित करण्यासाठी  सिने कलाकारांना या कार्यक्रमात आवर्जून बोलवल्या जात असते.

मात्र या ठिकाणी बोलवल्या नंतर त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही आयोजकांची असते. मात्र चिखली तालुक्यात झालेल्या भाजपच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात मात्र नेहा पेंडसे यांना त्यांच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात त्रास झाला.यावर नेहा पेंडसे चांगल्याच संतापल्या असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.  यावेळी भाजपच्या महिला आणि बालकल्याण सभापती आणि जळगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय कुटे देखील उपस्थितीत होते.

नेहा पेंडसे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी सांगितलं की, व्यासपीठावर सेल्फी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमा झाले होते. आयोजकांना कार्यकर्त्यांना आवर घालता आला नाही त्यामुळे धक्काबुक्की झाली. हा प्रकार अत्यंत संतापजनक होता अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

खरं तर अशा प्रकारे जर सिने कलाकार कोणत्या कार्यक्रमाला बोलावले जात असतील तर त्यांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेणं खूप महत्त्वाचं असतं.

Loading...
Loading...

त्यांच्या चाहत्यांकडून त्यांना कोणताही त्रास होऊ नये याचीही दखल घेणे गरजेचं असत मात्र हेच बुलडाण्यात या भाजपच्या कार्यक्रमात झालेलं पाहायला मिळालं नाही.

'त्या' दहीहंडीशी माझा काहीही संबंध नाही- संतोष जुवेकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 5, 2018 10:46 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close