VIDEO : मराठा आंदोलन: तरुणांनी मुंडन करून केस पाठवले मुख्यमंत्र्यांना !

News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2018 06:20 PM IST

VIDEO : मराठा आंदोलन: तरुणांनी मुंडन करून केस पाठवले मुख्यमंत्र्यांना !

पंकज क्षीरसागर, परभणी, 27 जुलै : मराठा आरक्षण आणि इतर मागण्यासाठी शहरातील तहसील कार्यालयात चालू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी राज्य सरकारने दखल घेतली नसल्याच्या निषेधार्थ 27 जुलै रोजी मुंडन आणि अर्धनग्न आंदोलन करून काढलेले केस तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले.

VIDEO :...आणि नारायण राणेंनी दिल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

राज्यात मागील आठ दिवसापासून मराठा आरक्षण आणि इतर मागण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने जिल्हा,तालुका आणि ग्रामीण भागात ठीक ठिकाणी तीव्र आंदोलन करून आरक्षण आणि इतर मागण्या मांडण्यात येत आहेत परंतु, राज्य सरकारने याची दखल न घेतल्याने मराठा समाजाच्या भावना अधिकच तीव्र होत आहेत.

पेच येणार नाही, सरकार मराठा आरक्षण देऊ शकते-नारायण राणे

यातूनच शहरातील तहसील कार्यालयात सुरू असलेल्या सकल मराठा समाज याच्या वतीने ठिय्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शासनाचा निषेध करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेचे मुंडन करून श्राद्ध केले. यावेळी जवळपास शंभर तरुणांनी मुंडन करून निषेध केला.

Loading...

जातीवर नाही तर आर्थिक निकषांवर आरक्षण द्या - राज ठाकरे

तसंच अर्धनग्न आंदोलन यावेळी करण्यात आले या आंदोलनात  काढलेले केस निवेदन देऊन तहसीलदार सुरेश शेजुळ यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले आहेत. या आंदोलनात तालुक्यातील मराठा समाजातील युवकांचा मोठा सहभाग होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2018 06:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...