VIDEO : जालन्यात भाजप नेत्याची शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण, खड्ड्यात पुरण्याचा आरोप

भवर यांनी खांडेभारड यांच्या कुटुंबातील महिलांना देखील मारहाण केली.

News18 Lokmat | Updated On: Jan 28, 2019 05:30 PM IST

VIDEO : जालन्यात भाजप नेत्याची शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण, खड्ड्यात पुरण्याचा आरोप

सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी

जालना,28 जानेवारी : भाजपच्या किसन आघाडी जिल्हाध्यक्षाने एका शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाहीतर या शेतकरी कुटुंबाला खड्ड्यात टाकून जेसीबीच्या साहाय्याने खड्डा बुजवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शेतकरी कुटुंबाने केला आहे. विशेष म्हणजे शहरातच भाजप कार्यकारिणीची बैठक सुरू असतांना हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

भाजपचे किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष रावसाहेब भवर यांनी निवडुंगा येथील शेतकरी ज्ञानेश्वर खांडेभारड यांच्या शेतात विहिरी खोदण्यासाठी जेसीबी मशीन आणला होता. आपल्या शेतात अचानकपणे जेसीबी मशीन आणल्यामुळे या कुटुंबाने त्यांना विरोध केला. त्यामुळे भवर आणि त्यांच्या समर्थकांनी या कुटुंबाला जबर मारहाण केली. भवर यांनी खांडेभारड यांच्या कुटुंबातील महिलांना देखील मारहाण केली.

या घटनेनंतर खांडेभारड कुटुंबांनी पोलिसांत धाव घेतली असून तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही. जालन्यात भाजपची कार्यकारिणी आयोजित करण्यात आली आहे. या कार्यकारिणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच वरीष्ठ नेते हजर आहे.

=====================

Loading...बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2019 05:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...