विदर्भ सिंचन घोटाळा: 2 आठवड्यात प्रगती अहवाल द्या- कोर्ट

विदर्भातील कोट्यवधी रुपयाच्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचा दोन आठवड्यात प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jul 4, 2019 09:00 AM IST

विदर्भ सिंचन घोटाळा: 2 आठवड्यात प्रगती अहवाल द्या- कोर्ट

नागपूर, 04 जुलै: विदर्भातील कोट्यवधी रुपयाच्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचा दोन आठवड्यात प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. जनमंच या सामाजिक संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.

विदर्भातील सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसने नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देखील असल्याने संपूर्ण राज्याचे या प्रकरणाकडे लक्ष आहे. या प्रकरणी जनमंच सामजिक संस्थेने दाखल केलेली याचिका प्रलंबित होती. घोटाळ्याची चौकशी तातडीने पूर्ण करण्यात यावी आणि दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील अनेक कामांच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

काय आहे विदर्भातील सिंचन घोटाळा

विदर्भातील सिंचन प्रकल्पापैकी केवळ एकच टक्का सिंचन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या विभागातील 38 सिंचन प्रकल्पाची मुळ किंमत 6 हजार 672 कोटी इतकी होती ती वाढवून 26 हजार 722 कोटी रुपयांवर नेण्यात आला होता. प्रकल्पासाठीची ही दरवाढ विदर्भ सिंचन विकास महामंडळाने केली होती. मुळ प्रकल्पाच्या 300 पट वाढीमुळे सर्वांनाच धक्का बसला होता. विशेष म्हणजे 20 हजार कोटींच्या वाढीव खर्चाला केवळ 3 महिन्यात परवानगी मिळाली होती. इतकच नव्हे तर या खर्चाला कोणत्याही हरकतीशिवाय परवानगी देण्यात आली होती.

महत्त्वाचे मुद्दे

Loading...

>दरवाढीची कारणे- बांधकाम साहित्यातील भाववाढ, मजुरांवरील खर्च, इंजिनिअरिंग कामाचा खर्च आणि भूसंपादनात झालेली वाढ

>निम्न वर्था प्रकल्पाला राष्ट्रीय सुट्टी असलेल्या 15 ऑगस्ट रोजी मंजुरी. प्रकल्पाची किंमत 950 कोटीवरून 2 हजार 356 कोटी इतकी वाढवली.

>अमरावतीमधील अप्पर वर्धा प्रकल्पाची किंमत 661 कोटींवरून 1 हजार 376 कोटींवर पोहोचवली

>यवतमाळमधील बेंबळा नदीवरील प्रकल्पाची किंमत 1 हजार 278 कोटींवरून 2 हजार 176 कोटींवर पोहोचवली

>विदर्भ सिंचन विकास महामंडळाने 24 जून 2009 रोजी एकाच दिवसात 10 प्रकल्पांना दिली प्रशासकीय मंजुरी. तर 38 प्रकल्पांसाठी एकाच दिवशी निविदा जारी केल्या

VIDEO : 'वंचितला खरंच काँग्रेससोबत आघाडी करायची आहे?'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2019 09:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...