News18 Lokmat

विदर्भ बंदच्या आंदोलनाला हिंसक वळण

नागपूर जवळ गंगाभाई घाट परीसरात टायरची जाळपोळ करण्यात आली आहे. वर्धमान नगर इथे एसटीवर दगडफेक करण्यात आली आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 11, 2017 03:02 PM IST

विदर्भ बंदच्या आंदोलनाला हिंसक वळण

11 डिसेंबर: विधिमंडळाच्या  नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विदर्भ बंदचे आंदोलन  करण्यात येत आहे. पण या आंदोलनाला  आता हिंसक वळण मिळालं आहे. वेगळ्या विदर्भाच्या आंदोलना हिंसक वळण मिळालं आहे. जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत.

नागपूर जवळ  गंगाभाई घाट परीसरात टायरची  जाळपोळ करण्यात आली आहे.   वर्धमान नगर इथे एसटीवर दगडफेक करण्यात आली आहे.

या आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यासाठी शाळा, महाविद्यालयं बंद ठेवणे, व्यापारी प्रतिष्ठानं बंद राहावीत, यासाठी विविध संस्था संघटनांना विदर्भवादी नेत्यांनी आवाहन केलं होतं. त्याला अनेकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून विदर्भाच्या मुद्यावर काम करणाऱ्या सर्व छोट्या-मोठ्या संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. विदर्भातील जनतेने स्वयंस्फुर्तीने या आंदोलनात सहभागी होऊन सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही विदर्भवाद्यांनी केलं होतं. विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ कनेक्ट, विदर्भ माझा, जनमंच, जनसुराज्य पार्टी तसेच आठवले, खोबाग्रडे, गवई आणि जोगेंद्र कवाडे यांच्या गटाच्या पक्षांनीही या बंदमध्ये सहभाग घेण्याचं ठरवलं आहे.

स्वतंत्र विदर्भासह व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ११ डिसेंबर रोजी विदर्भ आंदोलन समितीच्यावतीने विदर्भ बंदची हाक देण्यात आली होती. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर बहिष्कार टाकत येत्या ११ डिसेंबर रोजी विदर्भ बंद आंदोलन करण्यात येतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 11, 2017 10:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...