ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी गो. मा. पवार यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी गो. मा. पवार यांचं निधन

गो. मा. पवार यांच्या निधनामुळे साहित्य वर्तुळात पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

  • Share this:

सोलापूर, 16 एप्रिल : ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी गो. मा. पवार यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. गो. मा. पवार यांच्या निधनामुळे साहित्य वर्तुळात पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

डॉ. गो. मा. पवार यांचा संक्षिप्त परिचय

- प्रा. गो. मा. पवार हे मराठी साहित्याचे व्यासंगी समीक्षक होते.

- मराठी साहित्याच्या सेवेबरोबरच त्यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनकार्य व साहित्याच्या संदर्भात विशेष अभ्यास केला होता.

- प्रा. पवार यांचा जन्म 13 मे 1932 रोजी सोलापूर जिल्ह्यातील पानगाव येथे झाला.

- शालेय शिक्षण नरखेड येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण हरिभाई देवकरण मध्ये झाले.

- मराठी विषयातून एम. ए. चे शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पूर्ण केले.

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून त्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर अध्यापनाच्या क्षेत्रात 33 वर्ष सेवा केली.

- यात शासकीय महाविद्यालय अमरावती, औरंगाबाद व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथेही अध्यापन कार्य केले.

- 1992 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर सोलापूर हीच कर्मभूमी मानून विपूल साहित्य निर्मिती केली.VIDEO : ...आणि भाजपच्या जाहिरातीतल्या 'पोस्टर बाॅय'ला राज ठाकरेंनी व्यासपीठावरच बोलावलं!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: poet
First Published: Apr 16, 2019 10:05 AM IST

ताज्या बातम्या