संप मिटला, संभ्रम कायम, किसान सभा संपावर ठाम

संप मिटला, संभ्रम कायम, किसान सभा संपावर ठाम

संपाबाबतच संभ्रम अजूनही कायम आहे.पुणतांब्यासह नाशिकमधील शेतकरीही संप सुरूच ठेवणार असल्याचं जाहीर केलंय.

  • Share this:

03 जून : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर शेतकरी संपाच्या कोअर कमिटीचे सदस्य जयाजी सूर्यवंशी यांनी संप मिटला असल्याचं जाहीर केलं असलं तरी काही संघटनांनी संप सुरूच राहणार असल्याची ठाम भूमिका घेतलीय विरोधकही संपूर्ण कर्जमाफीवर ठाम आहेत. त्यामुळे संपाबाबतच संभ्रम अजूनही कायम आहे..पुणतांब्यासह नाशिकमधील शेतकरीही संप सुरूच ठेवणार असल्याचं जाहीर केलंय.

किसान सभेचे राज्य सरचिटणीस डाॅ. अजित नवले यांनी सांगितलं, ' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सदाभाऊ खोत व शिष्टमंडळामध्ये, अगोदरच सर्व ठरले असल्याची जाणीव बैठकीत होत होती. सर्व अगोदरच ठरले असल्याने माझे कोणीही ऐकले नाही.' ते म्हणाले, 'सबब पहाटे 3.45 वाजता किसान सभेचे केंद्रीय सहसचिव डॉ अशोक ढवळे यांच्याशी फोनवर चर्चा करून मी वर्षा बंगल्यातून बाहेर पडत मीडियाला सामोरे गेलो. झालेली तडजोड किसान सभेला मान्य नसल्याचे आणि महाराष्ट्रातील लढाऊ शेतकऱ्याच्या या ऐतिहासिक संपलढ्याशी विश्वासघात असल्याचे प्रेसला अगोदर जाहीर केले. त्यानंतर शिष्टमंडळ व मुख्यमंत्र्यांनी संप मागे घेतल्याचे संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. मी त्या पत्रकार परिषदेत सामील झालो नाही.'

किसान सभेचं मुख्यमंत्री-शेतकरी बैठकीबाबत काय आहे म्हणणं? 

 किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी मांडलेले मुद्दे खालीलप्रमाणे

- सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा आणि स्वामिनाथन समितीच्या शिफारसी अमलात आणा अशी संपाची मागणी होती.

- मुख्यमंत्र्यांनी चर्चेत कोणाचे किती मर्यादेपर्यंत कर्ज माफ करणार हे स्पष्ट करण्यास नकार दिला. याबाबत समिती स्थापन करून पुढील चार महिन्यात हे स्पष्ट करू असे सांगितले. कर्ज माफी झालेली नाही. पुन्हा एकदा शेतकऱ्यांना गाजर दाखविले गेले आहे.

- स्वामिनाथन समितीची उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा या आधारावर किमान आधारभूत भाव देण्याची शिफारस वा तिच्या अन्य कोणत्याही शिफारसी मान्य करण्यात आल्या नाहीत.

- शेतकऱ्यांना पेन्शन देणे शक्य नसल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

- दुधाच्या भाववाढीचे गाजरही बेभरवशाचे आहे.असे असताना संप मागे घेऊ नका असे मी शिष्टमंडळातील  सर्व सदस्यांना वारंवार विनंती करत होतो.आपण पुणतांब्याला ग्रामसभा घेऊ व त्यात निर्णय घेऊ म्हणून विनंती करत होतो. संप मागे घेऊ नका, किमान आपल्याला पाठिंबा देणाऱ्या सर्व शेतकरी नेत्यांना आणि संघटनांना तरी विश्वासात घ्या, असे मी जीव काढून सांगत होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 3, 2017 10:26 AM IST

ताज्या बातम्या