S M L

परतीच्या पावसामुळे भाज्या महागल्या

परतीच्या पावसानं या भावात आणखी वाढच होण्याची शक्यता आहे. एकीकडे परतीच्या पावसानं शेतकरी हैराण झाला आहे. तर दुसरीकडे भाववाढीनं ग्राहकही चितेंत आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 23, 2017 08:52 AM IST

परतीच्या पावसामुळे भाज्या महागल्या

पुणे,23 ऑक्टोबर: पुण्यात भाज्यांचे भाव कडाडलेले आहेत . परतीचा पाऊसामुळे भाजीपल्याचं नुकसान झाल्याने भाज्यांचे भाव पुन्हा कडाडले आहेत .

परतीच्या पावसाने दिवाळीत काही काळ विश्रांती घेतली होती. पण कालपासून पुणे आणि परिसरात पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे भाज्यांचे भाव कडाडले आहेत. परतीच्या पावसानं या भावात आणखी वाढच होण्याची शक्यता आहे. एकीकडे परतीच्या पावसानं शेतकरी हैराण झाला आहे. तर दुसरीकडे भाववाढीनं ग्राहकही चितेंत आहे.

पुण्यात भाज्यांचे भाव वाढत असताना विदर्भात मात्र शेतकऱ्यांना हमीभावही मिळत नाहीये. विदर्भात दिवाळीच्या मुहूर्तावर व्यापाऱ्यांनी सोयाबीनच्या खरेदीला सुरवात केली आहे. पण हमीभावाने खरेदी होतं नसल्याने सोयाबीन उत्पादकांची लूट होतेय. यावर्षी केंद्र सरकारने सोयाबीनचा हमी भाव ३०५० रुपये प्रति क्विंटल जाहीर केला आहे. तरी खुल्या बाजारात सोयाबीनला प्रति क्विंटल १६०० ते २१०० रुपये भाव मिळत आहे. या व्यवहारात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होतेय. तरी केंद्र आणि राज्य सरकार यासंदर्भात काहीही करायला तयार नाही. यामुळे विदर्भातील सोयाबीन शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

भाज्यांचे वधारलेले भाव

कांदा - 45

Loading...

बटाटा - 18

फ्लॉवर - 120

कोबी -80

टोमॅटो - 50

आलं - 80

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 23, 2017 08:52 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close