सातजन्मी हिच पत्नी मिळो, चक्क पती मंडळींनी घातल्या वडाला फेऱ्या

सातजन्मी हिच पत्नी मिळो, चक्क पती मंडळींनी घातल्या वडाला फेऱ्या

ढोल ताशाच्या गजरात येत पुरुषांनी वट पौर्णिमेची पूजा केली. आज महिला पुरूषांच्या बरोबरीनं काम करतायेत.

  • Share this:

08 जून : पुणे तिथे काय उणे असं उगाच म्हटलं जात नाही. आज वटपौर्णिमेच्यानिमित्त सर्वत्र महिला वडाची पुजा करताना दिसतायेत. पण पुण्यात पुरुषांनीच वडाची पुजा करून फेऱ्या घातल्या.

वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पुजा करून  सातजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना महिला करतात. पण पुण्यात पिंपळे -गुरूव इथं थोडं वेगळं पाहायला मिळालं. इथं पुरूषांनीच वडाला फेऱ्या घालत वटपौर्णिमा साजरी केली.

ढोल ताशाच्या गजरात येत पुरुषांनी वट पौर्णिमेची पूजा केली. आज महिला पुरूषांच्या बरोबरीनं काम करतायेत. त्या ना नेहमी साथ देतात. म्हणूनच महिलांनीच का? पुरूषांनीही जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी अशी प्रार्थना चक्क त्यांनी केलीय.

पुण्यातील ह्यूमन राईट प्रोटेक्शन अँड अवेरन्स असोसिएशनच्या या परिवर्तनवादी संस्थेनं  ही आगळीवेगळी वटपौर्णिमा साजरी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 8, 2017 04:18 PM IST

ताज्या बातम्या