News18 Lokmat

पुणे : 96 लाख लुटणाऱ्या 'वर्दी'तल्या चोरांना ३ वर्षांची सक्तमजुरी

या प्रकरणाने शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे़

News18 Lokmat | Updated On: Sep 4, 2018 07:55 PM IST

पुणे : 96 लाख लुटणाऱ्या 'वर्दी'तल्या चोरांना ३ वर्षांची सक्तमजुरी

वैभव सोनावणे, पुणे, 04 सप्टेंबर : मांजरी येथील गंधर्व रेसिडेन्सी इथं वासन आय केअर हॉस्पिटलची ९६ लाख रूपयांची रोकड लुटल्याप्रकरणी पुण्यातील सत्र न्यायालयाने तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीधर नकुल यादव यांच्यासह चौघांना ३ वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी ५ हजार रुपयांची शिक्षा सुनावली. या प्रकरणाने शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे़.

नोव्हेंबर २०१५ मध्ये मांजरी येथील गंधर्व रेसिडेन्सी इथं पोलिसांनी वासन आय केअर हॉस्पिटलची ९६ लाख रूपयांची रोकड लुटली होती. अखेर तीन वर्षांनंतर या प्रकरणाचा आज निकाल आलाय. पुण्यातील सत्र न्यायालयात सत्र न्यायाधीश ए़ एस़ बौसाळे यांच्यापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी पोलीस ठाण्यात तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीधर नकुल यादव, पोलीस कर्मचारी गणेश मोरे, पोलीस मित्र अविनाश देवकर आणि रविंद्र सोपान माने या चौघांना ३ वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी ५ हजार रुपयांची शिक्षा सुनावली.

काय आहे प्रकरण

Loading...

विशाल धेंडे हे कोथरूड येथील हॉस्पिटलमध्ये चालक म्हणून काम करत होते. वासन आय केअरच्या पुण्यात कोथरूड, सदाशिव पेठ आणि मगरपट्टा इथं शाखा आहेत. मोटारचालक विशाल धेंडे हे हॉस्पिटलची रोकड मगरपट्टा इथं घेवून गेलं होतं.

वासन आय केअर हॉस्पिटलचे डॉ़ ठाकूर यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी बँकेतून काढलेले ६० लाख आणि रुग्णालयाच्या वेगवेगळ्या केंद्रातून जमा झालेले ३६ लाख रुपये असे ९६ लाख रुपये मोटारीत ठेवले होते. ते गंधर्व हॉटेलमध्ये जेवायला गेले होते़

सहायक पोलीस निरीक्षक यादव आणि त्यांचे सहकारी पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी मोटारीतील पैशांबाबत विचार करुन धेंडे यांना मारहाण केली़ त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेलं.

मोटारीत हत्यार सापडल्याचं सांगून उलट सुलट चौकशी सुरू केली़ पहाटे चारला ९६ लाख रुपये घेऊन चालक आणि त्यांच्या सोबत असलेल्या इतरांना पोलीस ठाण्यातून बाहेर काढण्यात आलं त्यांनी हे पैसे घेतले.

रुग्णालयाच्या इतर अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली़ यावेळी केलेल्या तपासात सहायक निरीक्षक यादव आणि इतरांनी ९६ लाख रुपये लुटल्याची धक्कादायक माहिती पुढे आली होती़.

राम कदम यांच्या या वक्तव्यामुळं झाला वाद : पहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 4, 2018 07:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...