वसईमध्येही मुजोर वाहनचालकाची वाहतूक पोलिसाला मारहाण

वसईमध्येही एका वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना घडली आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 10, 2017 09:43 PM IST

वसईमध्येही मुजोर वाहनचालकाची वाहतूक पोलिसाला मारहाण

10 आॅगस्ट : वाहतूक पोलिसांना मारहाण करण्याच्या घटना वारंवार घडत आहे. आता वसईमध्येही एका वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करून  मारहाण केल्याची घटना घडली आहे. सोहेल मेनन असं मारहाण करणाऱ्या इसमाचं नाव आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

काळू विट्ठल मूंडे असं या पोलीसाच नाव आहे. सोमवारी ७ ऑगस्टला वसईच्या पार्वती क्रॉस या सिंग्नलवर भर रस्त्यात ही घटना घडली आहे. या मारहाणीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोहेल मेनन असं मारहाण करणाऱ्या इसमाचं नाव आहे. सोहेल ने सिग्नल तोडण्यावरून पोलिसाशी बाचाबाची झाली. आणि त्याने चक्क पोलिसाच्या श्रीमुखात लगावली. एकदा मारहण करून हा इसम शांत झाला नाही तर तो वारवार अंगावर धावून मारहाण करत होता.

धक्कादायक बाब म्हणजे भर चौकात इतकी गर्दी असताना सुद्धा एक ही व्यक्ती या पोलीस कर्मच्याऱ्याला सोडवण्यासाठी पुढे आला नाही. तर मानिकपूर पोलिसांनी सुद्धा मारहान करनाऱ्या या व्यक्तीविरोधात केवळ एक एनसी नोंदवली आहे हे विशेष. अज़ून हीं मारहाण करणाऱ्याला अटक झाली नाही. वसई वाहतूक आणि माणिकपूर पोलीस तर चक्क मारहाण झालीच नसल्याचं सांगत आहेत. केवळ बाचाबाची झाल्याचं सांगून प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं समजतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 10, 2017 06:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...