वरोरा आगीपासून थोडक्यात बचावलं; वीजकेंद्रातील आगीमुळे 35 गावांचा पुरवठा ठप्प

ण आजूबाजूच्या तब्बल 35 गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे

Chittatosh Khandekar | Updated On: Jan 2, 2018 12:32 PM IST

वरोरा आगीपासून थोडक्यात बचावलं; वीजकेंद्रातील आगीमुळे 35 गावांचा पुरवठा ठप्प

02जानेवारी:  चंद्रपूरमधील वरोरा शहर आगीपासून थोडक्यात बचावलंय.  काल रात्री वरोरामधल्या वीज उपकेंद्रात भीषण आग लागली. ही आग विजवण्यात वेळेवर यश आल्यामुळे वरोरा शहर थोडक्यात बचावलंं आहे. पण आजूबाजूच्या तब्बल 35 गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे

वरोरा शहरातील २२० केव्ही वीज उपकेंद्रात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती. काल रात्रीच्या सुमारास वरोऱ्यातील वीज केंद्रावर आग लागली. या आगीमुळे तेथील 3-4  ट्रान्सफॉर्मर्समध्ये मोठे  स्फोट झाले होते . सुदैवानं आग वेळेत विझवण्यात प्रशासनाला यश  आलं. याप्रसंगी कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान बाळगलं होतं त्यामुळे धोका टळला  आणि पुढचा अनर्थ टळला. आग इतकी भीषण होती की त्यानं संपूर्ण परिसर हदरला. या आगीमुळे ३५ गावांचा वीजपुरवठा ठप्प झालाय. तो सुरळीत होण्यासाठी आणखी २- 3  तास लागणार आहेत अशी माहिती  अधिकाऱ्यांनी दिली आहे. तरीही वीज पुरवठा सुररळीत व्हायला अजून बराच वेळ लागेल असं सुत्रांनी  सांगितलं आहे.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 2, 2018 12:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close