'EVM हटावो, देश बचावो', वंचित बहुजन आघाडीने पुकारले आंदोलन

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात वंचित बहुजन आघाडीने सोमवारी महाराष्ट्रभर 'EVM हटावो, देश बचावो' पुकारले आहे. राज्यभरात जिल्हा आणि तालुका मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2019 03:38 PM IST

'EVM हटावो, देश बचावो', वंचित बहुजन आघाडीने पुकारले आंदोलन

मुंबई, 17 जून- लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे मताधिक्य मिळाले. या मताधिक्क्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मतमोजणीतील आकडेवारीत तफावत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात वंचित बहुजन आघाडीने सोमवारी महाराष्ट्रभर 'EVM हटावो, देश बचावो' पुकारले आहे. राज्यभरात जिल्हा आणि तालुका मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

अहमदनगर शहरात वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अशोक सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर आंदोलन करण्यात आले. EVM हटावो, देश बचावो, विधानसभा निवडणुकित बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. निवासी जिल्हाधिकारी अनंत पाटील यांना निवेदन देण्यात आले.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या सर्व 48 मतदारसंघाचे एकूण झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मोजणी केलेले मतदान यामध्ये तफावत आढळून येते. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे 'EVM हटाव देश बचाव' चा नारा देत भारीप बहुजन आघाडीने दिला आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

EVM च्या वापरा विरोधात पंढरपूर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आघाडीचे प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांनी यापूर्वी आंदोलनाचा इशारा दिला होता. पंढरपुर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. दरम्यान राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत EVM ऐवजी मतपत्रिकांव्दारे (बॅलेट पेपर) मतदान व्हावे, अशी मागणी करण्यात आली. भारत निवडणूक आयोगाने EVM वापराचा अट्टाहास करून पारदर्शक निवडणूक घेतल्या नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. नागरिकांच्या मुलभूत अधिकारांचे उल्लंघन करणे हा अपराध आहे. निवडणूक आयोगाने हा अपराध केल्याचा आरोप करण्यात आला आहे. देशभरात EVM विरोधात असंतोष वाढत असून या लोकसभा निवडणुकीत लागलेल्या निकालामुळे जनताही आश्चर्यचकित झाली असल्याने आंदोलन करण्यात आल्याचे सुनील वाघमारे यांनी सांगितले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2019 03:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...