काँग्रेस, राष्ट्रवादीला बसणार मोठा धक्का, हे तीन मोठे नेते भाजपच्या गळाला..

विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेससह राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील तीन मोठे नेते भाजपच्या वाटेवर आहेत. त्यात एक काँग्रेसचा तर दोन राष्ट्रवादीचे नेते आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jul 26, 2019 06:01 PM IST

काँग्रेस, राष्ट्रवादीला बसणार मोठा धक्का, हे तीन मोठे नेते भाजपच्या गळाला..

मुंबई, 26 जुलै- विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेससह राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील तीन मोठे नेते भाजपच्या वाटेवर आहेत. त्यात एक काँग्रेसचा तर दोन राष्ट्रवादीचे नेते आहेत. वडाळा मतदारसंघातून तब्बल सहावेळा विधानसभेवर निवडून आलेले काँग्रेसचे आमदार आणि माजी राज्यमंत्री कालिदास कोळंबकर भाजपच्या वाटेवर आहेत. कालिदास कोळंबकर यांनी मुख्यंमत्री देवेंद्र फडणविस, चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याचा विकास करण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे, असे सांगून कोळंबकर यांनी यापूर्वीच भाजप प्रवेशाचे संकेत दिले होते.

राष्ट्रवादीला लागलेली गळती सुरूच...

राष्ट्रवादीला लागलेली गळती सुरूच आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, त्यांचे चिरंजीव आमदार वैभव पिचड आणि राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ पुढील आठवड्यात भाजपत प्रवेश करण्याची शक्यता आहे. वैभव पिचड यांनी ठरल्यानुसार सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. हे सर्वजण पिचड यांच्यासह लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 30 जुलैला काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांत तिघांनीही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे. भाजप नेते प्रसाद लाड यांच्या मदतीने राष्ट्रवादीला भगदाड पाडण्याचे प्रयत्न सुरू आहे.

कोळंबकर यांनी केला हा आरोप...

कालिदास कोळंबकर यांना 2014 च्या विधानसभा निवडणुकीत निसटता विजय मिळाला होता. भाजपच्या उमेदवाराने कोळंबकर यांना घाम फोडला होता. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केल्यास आपण निवडून येऊ, असा विश्वास त्यांना वाटत आहे. स्प्रिंग मिल कम्पाऊंडमधील गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्न त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सोडवून घेतला. 'मी काँग्रेसचा आमदार असून आघाडी सरकारच्या काळीत गिरणी कामगार आणि पोलिसांचे प्रश्न सुटले नाहीत. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना अनेकवेळा भेटलो. पण त्यांनी हे प्रश्न तसेच ठेवले', असा आरोप कोळंबकर यांनी केला आहे.

Loading...

नारायण राणे यांचे खंदे समर्थक..

कालिदास कोळंबकर हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे खंदे समर्थक मानले जातात. कोळंबकर यांनी शिवसेनेपासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली होती. राणे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी कोळंबकर यांना राज्य मंत्रिमंडळात संधी दिली होती. राणे यांनी पुन्हा काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वाभिमानी पक्ष स्थापन केला. परंतु या पक्षाच्या तिकिटावर मुंबईतील वडाळा मतदारसंघातून निवडून येणे अशक्य असल्याने कोळंबकर यांनी आता भाजपमध्ये प्रवेश करण्याचे मनाशी पक्के केले आहे.  आगामी विधानसभा निवडणुकीत ते वडाळा मतदारसंघात भाजपच्या तिकिटावर उभे राहतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

VIDEO: मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक, गार्डच्या डोक्याला गंभीर दुखापत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 26, 2019 05:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...